शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
3
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
4
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
5
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
6
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
7
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
8
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
9
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
10
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
11
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
12
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
13
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
14
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
15
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
16
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
17
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
18
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
19
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
20
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?

Kolhapur- उत्तरायण किरणोत्सव: सलग दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणे अंबाबाईच्या चेहऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 12:42 IST

प्रखर सूर्यकिरणे : ६ वाजून १७ मिनिटांनी अडथळ्यामागे

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवात शुक्रवारी मावळतीच्या सूर्यकिरणांनी सलग दुसऱ्या दिवशी देवीला सोनसळी अभिषेक केला. गुरुवारपेक्षा किरणांची तीव्रता जास्त असल्याने चरणापासून किरिटापर्यंत देवीची मूर्ती न्हाऊन निघाली. यावेळी भाविकांनी अंबा माता की जयचा गजर केला. सायंकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी किरणे लुप्त झाली.करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात वर्षातून दोनवेळा किरणोत्सव होतो. नव्या वर्षातील पहिल्या किरणोत्सवात गेल्या तीन दिवसांपासून सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीवर येत आहेत. गुरुवारी किरणे देवीच्या मूर्तीच्या मळवटापर्यंत आली होती. पण शुक्रवारी किरणांची प्रखरता अधिक असल्याने किरणे किरीटाच्यावरपर्यंत गेली. अगदी प्रभावळीवरदेखील त्याचे वलय दिसत होते. महाद्वार रोडवर ५ वाजून २८ मिनिटांनी आलेल्या किरणांनी एक एक टप्पा पार करत ६ वाजून १२ मिनिटांनी चरणस्पर्श केला.एक एक मिनिटांच्या अंतराने खांद्यापर्यंत आली. ६ वाजून १६ मिनिटांनी सूर्यकिरणे चेहऱ्यावर आली. एक मिनिटे चेहऱ्यावर स्थिरावली. ६ वाजून १८ व्या मिनिटाला किरणे अडथळ्यांमागे लुप्त झाली. यानंतर अंबाबाईची आरती करण्यात आली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे,, प्रा. मिलिंद कारंजकर उपस्थित होते.

आज शनिवारी किरणोत्सवाचा चौथा दिवस आहे. पण या कालावधीत किरणे अडथळ्यांमागे जातात असा अनुभव आहे. शनिवारी काय होते याची उत्सुकता आहे.सूर्यकिरणांचा प्रवास असा

  • महाद्वार रोड : ५ वाजून २८ मिनिटे
  • गणपती मंदिर : ५ वाजून ५५ मिनिटे
  • कासव चौक : ५ वाजून ५९ मिनिटे
  • पितळी उंबरा : ६ वाजून २ मिनिटे
  • चांदीचा उंबरा : ६ वाजून ४ मिनिटे
  • गाभाऱ्याची तिसरी पायरी : ६ वाजून ८ मिनिटे
  • कटांजन : ६ वाजून ११ मिनिटे
  • चरणस्पर्श : ६ वाजून १२ मिनिटे
  • कमरेपर्यंत : ६ वाजून १३ मिनिटे
  • खांद्यापर्यंत : ६ वाजून १५ मिनिटे
  • चेहऱ्यावर : ६ वाजून १६ मिनिटे
  • किरीटावर : ६ वाजून १७ मिनिटे
टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर