शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर, रूपाराणी निकम ५१ व्या महापौरपदी विराजमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:15 IST

जनसुराज्यचे अक्षय जरग उपमहापौर : ४६ विरुद्ध ३५ मतांनी झाल्या निवडी 

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या रूपाराणी संग्रामसिंह निकम या कोल्हापूर महानगरपालिकेच्या ५१ व्या महापौरपदी शुक्रवारी विराजमान झाल्या. तर उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची निवड झाली. निकम आणि जरग यांच्या निवडीमुळे कोल्हापूर महानगरपालिका इतिहासात प्रथमच महायुतीचा झेंडा फडकला. महापालिकेत प्रथमच सत्ता आल्याने महायुतीच्या सर्व नेत्यांसह कार्यकर्त्यांनी वाद्याच्या गजरात गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी करत मोठा जल्लोष केला.प्रथम वर्णानुक्रमाने रूपाराणी निकम यांच्यासाठी मतदान झाले. महायुतीच्या ४६ सदस्यांनी हात वर करून निकम यांना मतदान केले. त्यानंतर काँग्रेस आघाडीच्या सचिन मारुती शेंडे यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. तेव्हा त्यांच्या बाजूने ३५ नगरसेवकांनी मतदान केले. निकम यांना ११ मते जास्त पडल्याने त्या महापौरपदी निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही पंधरा मिनिटांचा अवधी देऊनसुद्धा कोणी माघार न घेतल्यामुळे अक्षय विक्रम जरग व दुर्वास कदम यांच्यासाठी हात वर करून मतदान घेण्यात आले. यावेळी जरग यांना ४६ तर कदम यांना ३५ मते मिळाली. त्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी जरग यांना ११ मतांनी विजयी झाल्याचे घोषित केले.महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक ३४ जागा जिंकूनदेखील काँग्रेस पक्षाला सत्ता गमवावी लागली. निवडणुकीत काँग्रेससोबत असणाऱ्या उद्धवसेनेला केवळ एकच जागा मिळाल्याने सत्तेपर्यंत पोहोचण्यात त्यांना संख्याबळाची अडचण आली. या निवडणुकीच्या निमित्ताने महाडिक घराण्याने महानगरपालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले. आपल्या पक्षाचा महापौर करण्याचे भाजपचेही स्वप्न पूर्ण झाले. या निवडणुकीत भाजपला २६, शिंदेसेनेला १५, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला ४ आणि जनसुराज्य पक्षाला एक असे बळ महायुतीला मिळाले आहे.शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेला ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने सुरुवात झाली. नगरसचिव सुनील बिदरे यांनी सभेचा अजेंडा वाचून दाखविल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. सर्वप्रथम महापौरसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली.निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. निवडणूक काळात महापालिकेसमोरील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. पोलिस बंदोबस्तही मोठा ठेवण्यात आला होता.चंद्रकांतदादांचे स्वप्न पूर्ण२०१४ मध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडून केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आले होते. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी २०१५ च्या महापालिका निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक, ताराराणी आघाडीचे सहकार्य घेत महापालिकेची सत्ता मिळविण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु त्यावेळी थोडक्यात सत्तेने हुलकावणी दिली. परंतु हेच स्वप्न बघत भाजपने तब्बल दहा वर्षांनी महापालिकेवर झेंडा फडकावीत भाजपच्या रूपाराणी निकम यांना महापौर केले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's Nikam First Mayor of Kolhapur; Mahayuti Celebrates Victory

Web Summary : Ruparani Nikam of BJP became Kolhapur's first BJP mayor. Akshay Jarg was elected Deputy Mayor. The Mahayuti alliance secured its first-ever Kolhapur Municipal Corporation win, celebrated with enthusiasm. Congress lost power despite winning the most seats. This victory fulfills Chandrakant Patil's decade-long vision.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMayorमहापौरBJPभाजपा