शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

Kolhapur- पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग: टोप येथे उड्डाणपूलाचे काम सुरू, ग्रामस्थांची मागणी अखेर पुर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 4:54 PM

सतीश पाटील शिरोली : टोप येथील ३५० मिटरच्या उड्डाणपूलाचे काम सुरू झाले असून. १२ पिलरवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार ...

सतीश पाटीलशिरोली : टोप येथील ३५० मिटरच्या उड्डाणपूलाचे काम सुरू झाले असून. १२ पिलरवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. सध्या मुख्य महामार्गावरील वाहतूक दोन्ही सेवा मार्गावरुन वळवली आहे. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सध्या सहा पदरीचे काम सुरू आहे. टोप येथे ३५० मिटरचे जायला आणि यायला असे दोन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी रोडवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. टोप हा अपघाताचा ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जातो. दोन्ही बाजूला उतार  आणि दोन्ही बाजूला वळणाचा रस्ता असल्याने तसेच रहदारी, महामार्गा लगत नागरी वस्ती, शाळा, गावगाडा चालणारी ग्रामपंचायत, मुख्यतः जोतिबा डोंगरावर जाणारा मार्ग, दोन्ही बाजूला हाॅटेल, धाबे, आठवडी बाजार, क्रशर आणि दगड खाण व्यवसाय , उद्योग कारखाने याठिकाणी असल्याने हा टोप फाटा कायमच गजबजलेला असतो. महामार्गा मुळे टोप गावचे झालेले पूर्व पश्चिम विभाजन त्यामुळे या ठिकाणी सतत अपघात होतात.‌‌ टोप येथे  जेव्हा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू होते तेंव्हाच हा उड्डाणपूल होणे गरजेचे होते. सन २००२ ते २००६ या काळात टोप ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी उड्डाणपूलाची मागणी उचलून धरली होती.‌ पण सहापदरी रस्ता होणार त्यावेळी आपण उड्डाणपूल करु असे आश्वासन दिले होते. पण गेल्या २० वर्षात याठिकाणी अनेक अपघात होवून कित्येकांचे प्राण गेले. अनेकजण जायबंद‌ झाले. पण सध्या सहापदरीकरण सुरू आहे. आणि टोप बाजार कट्टा ते बिरदेव मंदिर पर्यंत असा ३५० मिटरचे दोन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. हे उड्डाणपूल पिलर वरती उभारण्यात येणार असून त्यासाठी एकूण १२ पिलर उभारले जाणार आहेत. तसेच स्थानिक लोकांसाठी सेवामार्ग आणि जोतिबा डोंगरावर , कासारवाडी, सादळे मादळे, पन्हाळा जाण्यासाठी या उड्डाणपूला खालून रस्ता देण्यात येणार आहे. या उड्डाणपूलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रोडवेज कंपनीचे आहे. या उड्डाणपूला मुळे टोप गावचा मोठा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न सुटणार आहे.

टोप मध्ये उड्डाणपूल झाले पाहिजे यासाठी  पहिल्या पासून आमची मागणी होती. सध्या उड्डाणपूलाचे काम सुरू झाले आहे. टोप चा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.  हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. - तानाजी पाटील, सरपंच, टोप   

टोप येथील उड्डाणपूलाच्या कामाला सुरुवात झाली असून महामार्गावरील वाहतूक दोन्ही सेवा मार्गावर वळवली आहे. उड्डाणपूल लवकर पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. तो पर्यंत वाहनधारकांनी वाहने सावकाश चालवावीत. - वैभवराज पाटील, रोडवेज कंपनी प्रकल्प अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गPuneपुणेBengaluruबेंगळूर