मुसळधार पावसामुळे नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पोहोचले पुराचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 09:49 IST2025-06-21T08:27:59+5:302025-06-21T09:49:13+5:30

Kolhapur: मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीचे वाढलेले पाणी येथील प्रसिद्ध अशा दत्त मंदिरासमोर आज पहाटे पोहोचले आहे. सरासरी जुलै महिन्याच्या सुरुवातीला येथील दत्त मंदिरात पाणी येत असते चालू साली पावसाने लवकर हजेरी लावल्याने जून महिन्याच्या निम्म्यातच येथील दत्त मंदिराजवळ पाणी पोहोचले आहे.

Flood water reaches Datta temple in Nrusinghwadi due to heavy rains | मुसळधार पावसामुळे नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पोहोचले पुराचे पाणी

मुसळधार पावसामुळे नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पोहोचले पुराचे पाणी

नृसिंहवाडी - सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने व काही प्रमाणात धरणातून होणारे विसर्ग यामुळे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात तीन फुटाने वाढ झाली आहे.

दरम्यान कृष्णा नदीचे वाढलेले पाणी येथील प्रसिद्ध अशा दत्त मंदिरासमोर आज पहाटे पोहोचले आहे. सरासरी जुलै महिन्याच्या सुरुवातीला येथील दत्त मंदिरात पाणी येत असते चालू साली पावसाने लवकर हजेरी लावल्याने जून महिन्याच्या निम्म्यातच येथील दत्त मंदिराजवळ पाणी पोहोचले आहे.

येथील दत्त देवस्थान मार्फत मंदिर परिसरातील साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास लवकरच येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न होण्याची शक्यता आहे

Web Title: Flood water reaches Datta temple in Nrusinghwadi due to heavy rains