शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कोल्हापुरात पूरपरिस्थिती, राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले; पूरक्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 16:48 IST

नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतूक बंद

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने पूरपरिस्थिती उद्धभवण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसापासून शहरात पावसाचा जोर कमी असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरु आहे. यामुळे धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. परिणामी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे.

राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुलेजिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा आज, पहाटे खुला झाला. एकूण सात दरवाज्या पैकी पहाटे 5:30 वाजता 6 नंबरचा दरवाजा खुला झाला. यानंतर सकाळी 8.55 वाजता गेट क्रमांक 5 खुले झाले. दुपारी 2:20 वाजता स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 उघडला. यानंतर दुपारी  3:20 वाजता चौथा दरवाजा उघडला. असे एकूण 3, 4, 5, 6 नंबरचे चार दरवाजे उघडले आहेत. या चार दरवाज्यातून 5712 क्युसेक तर पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक असा एकूण 7312 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखीन दरवाजे सुरू होण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.पंचगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढराधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे.  आज, दुपारी 3 वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फूट  09" इंच इतकी झाली होती. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पंचगंगेवरील 76 बंधारे पाण्याखालील गेले आहेत. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चित्रदुर्ग मठात आतापर्यंत १६ कुटुंबांचे स्थलांतरजयंती नाल्यालगत असणाऱ्या सुतारवाडा परिसरातील पुराचे पाणी वाढत असलेने १६ कुटुंबाचे चित्रदुर्ग मठात दुपारी दोन वाजेपर्यंत स्थलांतर झाले. यात १६ पुरुष, २२ स्त्रीया आणि २२ लहान मुलांचा समावेश आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगितकोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर  परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या आज, बुधवारी व उद्या (गुरुवारी) होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या संचालकांनी जाहीर केले आहे.गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा 96.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर, हातकणंगले- 12 मिमी, शिरोळ -3.9 मिमी, पन्हाळा- 48.9 मिमी, शाहूवाडी- 56.2 मिमी, राधानगरी- 54.2 मिमी, गगनबावडा- 96.9 मिमी, करवीर- 26.4 मिमी, कागल- 13.6 मिमी, गडहिंग्लज- 13.9 मिमी, भुदरगड- 35.6 मिमी, आजरा- 44.5 मिमी, चंदगड- 51.4 मिमी असा एकूण 32.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठाराधानगरी 236.13 दलघमी, तुळशी 88.19 दलघमी, वारणा 879.31 दलघमी, दूधगंगा 599.89 दलघमी, कासारी 65.46 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 66.25 दलघमी, पाटगाव 93.49 दलघमी, चिकोत्रा 39.72 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, आंबेआहोळ 30.98 जंगमहट्टी, जांबरे, चित्री मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

'या' मार्गावर पाणीकरूळ व भुईबावडा घाट बंद असल्याने फोंडा राधानगरी मार्गे वाहतूक चालू आहे. कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर केर्लीजवळ पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने कोकणात जाणारे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. निपाणी राधानगरी रस्त्यावर मुरगूड निढोरी दरम्यान वेदगंगा नदीचे पाणी आले आहे. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. त्यामुळे वाहनधारकांना वाहनचालवताना कसरत करावी लागत होती. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने हेरवाड अब्दुल लाट मार्गावर पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरुनही वाहतूक दुपारपर्यंत ठप्प होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKolhapur Floodकोल्हापूर पूरRainपाऊसDamधरण