Kolhapur-शक्तिपीठ महामार्ग: शेतकऱ्यांना पाचपट नुकसान भरपाई - क्षीरसागर; मंत्री मुश्रीफांवर केला आरोप

By समीर देशपांडे | Updated: February 28, 2025 17:00 IST2025-02-28T16:57:22+5:302025-02-28T17:00:06+5:30

कोल्हापूर  : विधानसभा निवडणुकीवेळी काही महायुतीच्या नेत्यांनी माझ्या विरोधातील उमेदवाराला आर्थिक रसद पुरवली. जिल्ह्यातील महायूतीतील काही नेत्यांचे काँग्रेसच्या नेत्यांशी ...

Five times compensation to farmers for land in Shaktipeeth Highway says MLA Rajesh Kshirsagar Accused on Minister Hasan Mushrif | Kolhapur-शक्तिपीठ महामार्ग: शेतकऱ्यांना पाचपट नुकसान भरपाई - क्षीरसागर; मंत्री मुश्रीफांवर केला आरोप

Kolhapur-शक्तिपीठ महामार्ग: शेतकऱ्यांना पाचपट नुकसान भरपाई - क्षीरसागर; मंत्री मुश्रीफांवर केला आरोप

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीवेळी काही महायुतीच्या नेत्यांनी माझ्या विरोधातील उमेदवाराला आर्थिक रसद पुरवली. जिल्ह्यातील महायूतीतील काही नेत्यांचे काँग्रेसच्या नेत्यांशी अंतर्गत संबंध असल्याचा आरोप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ त्यांचे नाव न घेता केला आहे.

क्षीरसागर म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग हा महायुतीचा ड्रीम प्रोजेक्ट त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांना या प्रकल्पाला विरोध करता येणार नाही. मी मित्रा या संस्थेचा उपाध्यक्ष असल्यामुळे राज्याचे प्रकल्प पुढे नेण्याची माझी जबाबदारी आहे. हसन मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. त्यांच्या खात्यापूरती त्यांची जबाबदारी मर्यादित आहे. त्यामुळे त्यांच्यासह महायुतीच्या कुणीही नेत्यांनी या प्रकल्पाला विरोध करू नये. शेतकऱ्यांना पाचपट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे असेही क्षीरसागर यावेळी म्हणाले.

इंडिया आघाडीने फेक निरेटिव्ह तयार करून हा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु त्यांचा पराभव झालेला आहे. शाहू छत्रपती यांचा विजय हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विजय आहे असेही क्षीरसागर म्हणाले.

Web Title: Five times compensation to farmers for land in Shaktipeeth Highway says MLA Rajesh Kshirsagar Accused on Minister Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.