खून प्रकरणातील पाच जणांना १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST2021-02-05T06:54:03+5:302021-02-05T06:54:03+5:30

इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील संदीप सुरेश मागाडे (वय २७, रा. हराटी भाग, कबनूर) याच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या ...

Five in murder case remanded in police custody till February 1 | खून प्रकरणातील पाच जणांना १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

खून प्रकरणातील पाच जणांना १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील संदीप सुरेश मागाडे (वय २७, रा. हराटी भाग, कबनूर) याच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या पाच जणांना सोमवारी न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तर अन्य संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. मुदस्सर खुदबुद्दीन घुणके (वय २१), शाहरूख आझाद शेख (२४), रोहन सतीश कुरणे (२०), राहुल अनिल शिंदे (२९, सर्व रा. कबनूर) व शाहरूख मुबारक अत्तार (२२, रा. जवाहरनगर) अशी त्यांची नावे आहेत. या खून प्रकरणातील ग्रा.पं. सदस्य कुमार कांबळेसह रवी कांबळे, रमजान सनदी, असिफ खटाळ, आकाश कांबळे, संकेत कांबळे, मोहसीन सनदी, राकेश कांबळे, ऋषिकेश वडर व अन्य पाच ते सहा संशयित फरार आहेत. संदीप याचा खून राजकीय वादातून झाला असल्याने अन्य कोणता अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कबनूर पोलीस चौकी तसेच गावातील मुख्य ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.

Web Title: Five in murder case remanded in police custody till February 1