शाळांमध्ये पहिली घंटा वाजली, कोल्हापूरातील शाळा परिसर पुन्हा गजबजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 04:42 PM2019-06-17T16:42:09+5:302019-06-17T16:44:26+5:30

उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर सोमवारी शाळांमध्ये पहिली घंटा वाजली. विद्यार्थ्यांच्या चेहर्यांवर नवे दप्तर, नवा डबा, वह्या पुस्तकांची नवलाई असतांना आपल्या मित्र-मंडळींना भेटण्याची उत्सुकता होती.तर दुसरीकडे बालवाडीत पाहिल्यांदाच शाळेत पहिले पाऊल टाकत असणार्या बालकांना आई-वडिलांना काही सोडवत नव्हते. तर मुलांचे जंगी स्वागतामुळे शाळा पुन्हा एकदा गजबजल्या.

The first bell ranged in schools, the school premises of Kolhapur resounded again | शाळांमध्ये पहिली घंटा वाजली, कोल्हापूरातील शाळा परिसर पुन्हा गजबजला

उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर सोमवारी शाळां सुरु झाली. (छाया : नसीर अत्तार )

Next
ठळक मुद्देशाळांमध्ये पहिली घंटा वाजलीकोल्हापूरातील शाळा परिसर पुन्हा गजबजला

कोल्हापूर : उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर सोमवारी शाळांमध्ये पहिली घंटा वाजली. विद्यार्थ्यांच्या चेहर्यांवर नवे दप्तर, नवा डबा, वह्या पुस्तकांची नवलाई असतांना आपल्या मित्र-मंडळींना भेटण्याची उत्सुकता होती.तर दुसरीकडे बालवाडीत पाहिल्यांदाच शाळेत पहिले पाऊल टाकत असणार्या बालकांना आई-वडिलांना काही सोडवत नव्हते. तर मुलांचे जंगी स्वागतामुळे शाळा पुन्हा एकदा गजबजल्या.

शहरातील इंग्रजी माध्यमांच्या बहुतांश शाळांची सुरुवात झाली. आज मराठी माध्यमांच्या शाळा सुरु झाली. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थी आणि पालकांची धावपळ पुन्हा एकदा सुरु झाली. सकाळीच नऊवाजल्या पासून अनेक मुलांना गणवेशात तयार होऊन बसले होते. मुलांच्या शाळा सुरु झाल्याने कुटुंबातील काही सदस्यांचे पुन्हा वेळापत्रक बदलले. काही पालकांनी मुलांना शाळेत सोडण्यासाठी गर्दी केली. रिक्षावाले मामांच्या रिक्षाचा व्हॉर्न पुन्हा एकदा गल्ली, कॉलनीत सकाळ पासून वाजत होते.

पहिल्याच दिवशी काहींच्या चेहरयावर उत्साह होता तर काही विद्यार्थी कंटाळवाणे होते. शाळेत गेल्यानंतर मात्र विद्यार्थी मित्र कंपनीत रमले. गळा भेट सुट्टीची मज्जा एकमेकांना सांगत होते. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्याच्या दृष्टीने शाळांनी जय्यत तयारी केली होती. बहुतांश शाळा परिसरात सुटी संपण्याआधीच स्वच्छता अभियान राबवत वर्ग, आवार चकाचक करण्यात आले.

विद्यार्थ्यांचे स्वागत रांगोळी आणि औक्षणाने करण्यात आले. मुलांना शाळेचे वातावरण अल्हाददायक वाटावे यासाठी त्यांच्या आवडीच्या कार्टून मंडळींना खास आवतन देण्यात आले होते. ध्वनीवर्धकावर देशभक्तीपर गीते वाजविण्यात आली. प्रवेशद्वारावर फुलांसह आंब्यांच्या पानांचे बांधलेले तोरण आणि विद्यार्थ्यांचे औंक्षण तर कुठे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. अशा उत्साही वातावरणात सोमवारी शहर परिसरातील शाळेमध्ये दिसून आला. पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या रोडावली होती,सुट्टीनंतर बालचमूंनी शाळेच्या पहिल्याच दिवशी जाण्याचा कंटाळा केला. बालवाडी पासून ते चौथीच्या वर्गांपर्यंत संख्या कमी राहिली.
 

 

Web Title: The first bell ranged in schools, the school premises of Kolhapur resounded again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.