नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना साडेचार लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST2021-07-10T04:18:11+5:302021-07-10T04:18:11+5:30

कोल्हापूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी शुक्रवारी नाकाबंदी केली होती. त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ...

A fine of Rs 4.5 lakh for violating the rules | नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना साडेचार लाखांचा दंड

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना साडेचार लाखांचा दंड

कोल्हापूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी शुक्रवारी नाकाबंदी केली होती. त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ४ लाख ६० हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर १९२ वाहने जप्त करण्यात आली असून तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

दिवसभरात पोलीस दलाच्यावतीने मास्क केसेसमध्ये १२३३ जणांकडून १ लाख ५० हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला. तर १४२८ वाहनधारकांवर नियमांचा भंग केल्याप्रकरणी २ लाख ८० हजार १०० रुपयांचा दंड करण्यात आला. याशिवाय ३३ आस्थापनांवर कारवाई करीत त्यांच्यावरही ३० हजारांचा दंड करण्यात आला. वाहनाचा विमा नसणे, प्रदूषण प्रमाणपत्र नसणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, मुदतबाह्य होणे आदी कागदपत्रांची पुर्तता नाही. त्यामुळे अशा १९२ वाहनधारकांची वाहने जप्त करण्यात आली.

Web Title: A fine of Rs 4.5 lakh for violating the rules