शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक व्यावसायिकांचे आर्थिक गणितच कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:12 IST

इंगळी : डिझेल दरवाढीमुळे ऊस वाहतूकदारांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. वाहतूकदारांचा सध्या मिळकतीतील ४० ते ५० टक्के ...

इंगळी : डिझेल दरवाढीमुळे ऊस वाहतूकदारांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. वाहतूकदारांचा सध्या मिळकतीतील ४० ते ५० टक्के खर्च केवळ डिझेलवर होत असून, वाहतूक व्यावसायिकांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे.

ऊस वाहतूक व्यवसायामध्ये वाढलेली गुंतवणूक, तोडणी मजुरांकडून होणारी फसवणूक, देखभाल दुरूस्तीमध्ये वाढलेला खर्च यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या या व्यवसायासमोर सततच्या डिझेल दरवाढीमुळे मोठे आर्थिक संकट निर्माण केले आहे. ऊस उत्पादक शेतकरी व कारखाना यामधील महत्त्वाचा दुवा असणारा ऊस वाहतूक व्यवसाय व्यवस्थेकडून कायमच दुर्लक्षित राहिला आहे. दिवसेंदिवस या व्यवसायामध्ये अडचणीत वाढ होत असल्याने व्यावसायिक यापासून परावृत्त होत आहेत व त्याचा मोठा फटका सर्वच साखर कारखान्यांना चालू हंगामामध्ये बसला आहे.

गेल्या तीन वर्षांच्या काळामध्ये गुंतवणूक, देखभाल दुरूस्ती व डिझेल दरवाढ यामध्ये एकत्रितपणे सर्वसाधारण ३० टक्के दरवाढ झाली. ३० टक्के दरवाढीची वाहतूकदारांची मागणी असताना, कारखानदारांनी २०१९-२० च्या गळीत हंगामामध्ये केवळ ९ टक्के दरवाढ दिली. डिझेलच्या दरातील वाढच ५ टक्के होती. पर्यायी ९ टक्के दरवाढ झाली असली, तरी वाहतूकदारांसाठी ती केवळ ४ टक्केच मिळाली. दरवाढ देताना डिझेल दर ७२ रुपये होता. आता डिझेलचा दर ८५ रुपयांपर्यंत आहे. वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नातील ४० ते ५० टक्के रक्कम डिझेलवर खर्च होत आहे. त्यामुळे या व्यवसायाचे गणितच कोलमडले आहे.

प्रत्यक्ष खर्चामध्ये वाढ होत असल्याने वाहतूकदार नेहमीच वाहतूक दरामध्ये वाढ करण्याची मागणी करीत आहेत. मात्र, डिझेल दरामध्ये झालेली वाढच डिझेल दर फरक म्हणून वाहतूकदारांना देऊन वाहतूक दरामध्ये वाढ करण्याचे कारखान्यांनी टाळले आहे. त्यामुळे हा व्यवसाय तोट्याचाच होत आहे. डिझेलसह अन्य खर्चाची वाढ पाहता, चालू हंगामामध्ये वाहतुकीच्या दरामध्ये मोठी वाढ करणे गरजेचे आहे; अन्यथा वाहतूक व्यवसायासह साखर कारखानदारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे.