शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकच्या माध्यमातून बॅंकेतील महिला अधिकाऱ्याची आर्थिक फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST

कोल्हापूर : फेसबुकच्या माध्यमातून कोल्हापुरातील एका नामांकित बॅंकेत काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यास एका व्यक्तीने भूलथापा लावून ३५ हजार ५०० ...

कोल्हापूर : फेसबुकच्या माध्यमातून कोल्हापुरातील एका नामांकित बॅंकेत काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यास एका व्यक्तीने भूलथापा लावून ३५ हजार ५०० रुपयांचा गंडा घातला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसात तक्रार दिली. शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे सायबरचे काम पाहणारे पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय चौगले यांनी कसोशिने तपास करून फसवणुकीची रक्कम अवघ्या २४ तासांत मिळवून दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका नामांकित बॅंकेत लवली कुमारी (मूळच्या बिहार) या अधिकारी आहेत. त्यांच्याशी फेसबुकद्वारे अनोळख्या व्यक्तीने मेसेज पाठवला. आपण परदेशी नागरिक असल्याचे भासवत तुमच्यासाठी भेटवस्तू पाठवली आहे, ती विमानतळावर कायदेशीर बाबीत अडकली, विमानतळावर ३५ हजार ५०० रुपये दंड झाला असून, तो भरावा लागेल, अन्यथा अडचणीत याल, अशी भीती दाखवली. त्या महिला अधिकाऱ्याकडून व्यक्तीने गुगल पे च्या माध्यमातून ३५ हजार ५०० रुपये मागवले. काहीवेळाने त्या महिला अधिकाऱ्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले, त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पो. नि. श्रीकृष्ण कटकधोंड यांनी पोलीस ठाण्यातील सायबरचे काम पाहणारे पोलीस दिग्विजय चौगले यांना तपासाच्या सूचना केल्या. चौगले यांनी कसोशिने तपास करत झालेल्या ट्रान्झेक्शनचा आधार घेत फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून दिली.

ऑनलाईन सुविधांचा लाभ घेताना सावधान!

ऑनलाईन सुविधांचा लाभ घेताना तसेच सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नये तसेच अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या कोणत्याही लिंक ओपन करू नयेत. महत्त्वाची बोलणी, व्यवहार अगर करार हे समक्ष भेटूनच करावेत. सोशल मीडियावरील फसव्या जाहिराती व अमिषांपासून सावधान राहावे. आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शाहूपुरी पोलिसांनी केले आहे.