शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीच्या वारणा योजनेला अंतिम मान्यता

By admin | Updated: June 24, 2016 00:47 IST

दोन महिन्यांत काम सुरू : ७१ कोटींच्या योजनेचा ‘अमृत’मध्ये समावेश; सुरेश हाळवणकर यांची माहिती

इचलकरंजी : दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीतून पाण्याचा उपसा करणाऱ्या ७१ कोटी रुपये खर्चाच्या नळ पाणी योजनेला शासनाच्या उच्चस्तरीय समितीने गुरुवारी अंतिम मान्यता दिली. या योजनेला प्रत्यक्षात येत्या दोन महिन्यांमध्ये सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.सद्य:स्थितीस शहरास पंचगंगा व कृष्णा या दोन नद्यांतून पिण्याच्या पाण्यासाठी उपसा केला जातो. पंचगंगा नदीतील प्रदूषण आणि उन्हाळ्यात कृष्णा नदीतील पाण्याची पातळी खालावल्यामुळे उन्हाळ्यामध्ये शहरास पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम म्हणून पाच दिवसांतून एक वेळ पाण्याचा पुरवठा होतो. अशा पार्श्वभूमीवर वारणा नदीतून पाण्याचा उपसा करणारी नळ योजना राबविण्याचा प्रस्ताव नगरपालिकेने शासनास दिला. वारणा नदीतून पाण्याचा उपसा करणारी नळ योजना १९.५ किलोमीटर लांबीची असून, नदीमध्ये कायमस्वरूपी पाण्याचा साठा राहावा, यासाठी नदीपात्रात दोन कोटी रुपये खर्चून बंधारा बांधण्यात येणार आहे. नव्या वारणा योजनेसाठी सन २०४९ मध्ये असणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून दररोज ८९ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करण्याची क्षमता या प्रकल्पात ठेवण्यात आली आहे.वारणा नळ योजनेबाबत सांगताना आमदार हाळवणकर म्हणाले, या योजनेचा अमृत सिटी आराखड्यामध्ये मागील वर्षी समावेश करण्यात आला. तसेच अमृत योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याकरिता कमी कालावधी शिल्लक असतानासुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून या योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. त्यासाठी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास प्रधान सचिव मनीषा म्हैसकर व मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मिलिंद म्हैसकर यांचे सहकार्य लाभले. इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेबाबत दानोळी परिसरामध्ये गैरसमज पसरविण्यात आला आहे. इचलकरंजीला लागणाऱ्या पाण्याचे आरक्षण चांदोली धरणात करण्यात आले असून, ते पाणी वारणा नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे दानोळी गावातील शेतकऱ्यांना कोणतीही पाणीटंचाई भासणार नाही. तसेच सध्या कृष्णा नदीमध्ये जाणारे पाणीसुद्धा चांदोली धरणामध्ये सोडले जाते. त्यामुळे इचलकरंजीसाठी असलेली नळ योजना दानोळी गावासाठी विकासाची ठरणार आहे. म्हणून या योजनेला विरोध करण्याची भूमिका ग्रामस्थांनी सोडून द्यावी, असेही आवाहन आमदार हाळवणकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)आमदारांच्या विरोधामुळे जादा भुर्दंड : बावचकरवारणा नदीतून पाणी आणणारी मूळ योजना दहा वर्षांपूर्वी नगरपालिकेतील कॉँग्रेसनेच तयार केली होती. त्यावेळी आमदार हाळवणकर यांनी केलेला विरोध आणि आता अमृत सिटी योजनेमध्ये या योजनेचा झालेला समावेश यामुळे नगरपालिकेला ही योजना महाग ठरत आहे, असा आरोप कॉँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर, गटनेते बाळासाहेब कलागते व उपनगराध्यक्ष महावीर जैन यांनी पत्रकार बैठकीत केला. ते म्हणाले, त्यावेळी वारणा योजना ५४ कोटींची होती. युआयडीएसएसएमटी या योजनेच्या पॅटर्नमधून या योजनेला पाच कोटी रुपये नगरपालिकेचा हिस्सा होता. आता मात्र ७२ कोटी रुपयांची ही योजना झाली असून, अमृत सिटीच्या पॅटर्नप्रमाणे नगरपालिकेचा हिस्सा १८ कोटींचा झाला आहे, तर जीवन प्राधिकरणाला त्याचे शुल्क पावणे दोन कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. परिणामी पंधरा कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड नगरपालिकेवर बसला आहे.