सात जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:08 IST2021-02-20T05:08:27+5:302021-02-20T05:08:27+5:30

इचलकरंजी : दाखल असलेल्या गुन्ह्यातील तक्रार मागे घे; अन्यथा ठार मारीन, अशी धमकी देऊन २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सात ...

Filed charges against seven people | सात जणांवर गुन्हा दाखल

सात जणांवर गुन्हा दाखल

इचलकरंजी : दाखल असलेल्या गुन्ह्यातील तक्रार मागे घे; अन्यथा ठार मारीन, अशी धमकी देऊन २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सात जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची तक्रार धुळाप्पा अप्पा पुजारी (वय ६३, रा. चंदूर, ता. हातकणंगले) यांनी दिली आहे.

मनीष सत्यनारायण मानधना, योगेश सत्यनारायण मानधना, विकास गाताडे, विजय गलगले, चंद्रकांत खानाज, त्यांचा मुलगा व अशोक दायमा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ३ सप्टेंबर २०२० ला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शाहू कॉर्नरजवळ वरील संशयितांनी येऊन धुळाप्पा यांना आधीची तक्रार मागे घेण्यास सांगितले; अन्यथा जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच कुटुंबालाही जिवंत सोडणार नाही. खोटी तक्रार दाखल करून अडकवेन, असे म्हटल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानुसार पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Filed charges against seven people