उचगावातील दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:46 IST2021-02-21T04:46:16+5:302021-02-21T04:46:16+5:30

इनोव्हा कार खरेदी देतो असे सांगून केदार दिलीप ढोणे (वय ३३, रा. लोणार वसाहत, कोल्हापूर) यांच्याकडून ३ ...

Filed a case of fraud against two persons from Uchgaon | उचगावातील दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

उचगावातील दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

इनोव्हा कार खरेदी देतो असे सांगून केदार दिलीप ढोणे (वय ३३, रा. लोणार वसाहत, कोल्हापूर) यांच्याकडून ३ लाख ८८००० रुपये घेतले. मात्र, चारचाकी गाडी दिली नाही म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी सद्दाम खुदबुद्दीन जमादार व मयूर पाटील ( दोघे रा. मणेर मळा उचगाव, ता. करवीर) या दोघांच्या विरोधात गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. केदार ढोणे यांचा उचगाव हद्दीत सिमेंट पाईप विक्रीचा कारखाना आहे. सद्दाम जमादार व मयूर पाटील यांनी ढोणे यांना इनोव्हा कार खरेदी देतो असे सांगत फेब्रुवारी २०२० ते ३ ऑगस्ट २०२० या काळात रोख व चेक असे मिळून ३९००० ची रक्कम घेतली. यावेळी सद्दाम मुजावर व मयूर पाटील यांनी एमएच ०९ डीएक्स ८६९९, एमएच १० सीबी ६००६ या नंबरच्या दोन इनोव्हा कार दाखवल्या. मात्र, पैसे मिळाल्यानंतर त्यांनी ढोणे यांना इनोव्हा कार दिली नाही. काही कालावधी गेल्यानंतर ढोणे यांनी गाडी द्या, अन्यथा पैसे परत करा, असे सांगितले. या दोघांनीही पैसे परत देणार नाही व धमकी दिल्याची तक्रार ढोणे यांनी गांधीनगर पोलिसांत दिली आहे. याबाबत फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास गांधीनगर पोलीस करीत आहेत.

Web Title: Filed a case of fraud against two persons from Uchgaon