कुत्रे भुंकण्याच्या कारणावरून मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:02+5:302021-01-20T04:25:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर प्रतिनिधी . म्हाळसावडे ( ता. शाहूवाडी ) येथे कुत्रे भुंकण्याच्या व बांधण्याच्या कारणावरून राजेंद्र ...

Fights over barking dogs | कुत्रे भुंकण्याच्या कारणावरून मारामारी

कुत्रे भुंकण्याच्या कारणावरून मारामारी

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर प्रतिनिधी . म्हाळसावडे ( ता. शाहूवाडी ) येथे कुत्रे भुंकण्याच्या व बांधण्याच्या कारणावरून राजेंद्र मारुती कांबळे व गीता राजेंद्र कांबळे या दोघांना गावातील पाच जणांनी अनधिकृतपणे घरात घुसून बॅटने मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी चंद्रकात पाटील , चंद्रकांत तडावळेकर , बाळाराम पाटील , सर्जेराव कांबळे , पांडुरंग कांबळे याचेवर शाहूवाडी पोलिसात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत ( ॲट्राॅसिटी ) गुन्हा दाखल झाला आहे .... पोलिसातून मिळालेली महिती अशी राजेंद्र कांबळे यांनी गावठी कुत्रे पाळले आहे . कुत्रे इथे का बांधतोस तुझे कुत्रे नेहमी भुंकते म्हणून पाच जणांनी घरात घुसून राजेंद्र कांबळे व गीता कांबळे हिच्याशी वाद घालून सर्जेराव कांबळे याने राजेंद्र यास बॅटने मारहाण केली . पांडुरंग कांबळे याने शिवीगाळ केली . चंद्रकांत पाटील , चंद्रकांत तडावळेकर , बाळाराम पाटील या तिघांनी गीता कांबळे हिच्याशी वाद घालून जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली . अधिक तपास अनिल कदम करीत आहेत .

Web Title: Fights over barking dogs