शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

पर्यटनवाढीसाठी येत्या फेब्रुवारीत कला महोत्सव  तर एप्रिल-मेमध्ये विनाशुल्क पर्यटन सहली आयोजित करणार - पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 5:35 PM

 कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी येत्या फेब्रुवारी मध्ये तीन दिवसांचा कला महोत्सव तर एप्रिल-मे या दोन महिन्यात 2-2 दिवसाच्या 40 ते 50 विनाशुल्क पर्यटन सहली आयोजित करण्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केली.  

  कोल्हापूर -  कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी येत्या फेब्रुवारी मध्ये तीन दिवसांचा कला महोत्सव तर एप्रिल-मे या दोन महिन्यात 2-2 दिवसाच्या 40 ते 50 विनाशुल्क पर्यटन सहली आयोजित करण्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केली.  

    पोलीस मुख्यालयासमोरील पोलीस उद्यानातील 6 एकर जागेमध्ये आयोजित केलेल्या महाराष्ट्रात प्रथमच होत असलेल्या कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हलचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आला, त्या प्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमास अंजली चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवसस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संदीप देसाई, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पाचे प्रमुख सुजय पित्रे, राहुल कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.     कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी गेल्या तीन वर्षात अनेकविध उपक्रम हाती घेतल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आतापर्यंत कोल्हापूरातील काही चौक आणि रस्त्यांचे सुशोभिकरण करण्याबरोबरच नवऊर्जा उत्सव आणि आज भव्य फ्लॉवर फेस्टिव्हल आयोजित करण्यात येत आहे. कोल्हापूर पर्यटनदृष्ट्या महत्वाचा जिल्हा असून कोल्हापुरात या पुढील काळात अधिक पर्यटक यावेत यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने येत्या 9,10 व 11 फेब्रुवारी 2018 असा तीन दिवसांचा कला महोत्सव आयोजित करण्यात येणार असून यामध्ये जागतिक किर्तीच्या कलावंतांना अमंत्रित करण्यात येत आहे. या कलामहोत्सवात दररोज किमान 50 हजार लोकांचा सहभाग राहिल.  तसेच एप्रिल-मे 2018 मध्ये जिल्ह्यात पर्यटन वाढावे यासाठी या दोन महिन्यांमध्ये 2-2 दिवसांच्या 40 ते 50 निशुल्क पर्यटन सहली आयोजित करण्याचे नियोजन आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची वैशिष्ट्ये असलेली महत्वाची पर्यटनस्थळे दाखविण्या येणार आहेत या पर्यटन सहलीसाठी ऑनलाईन बुकींग करण्यात येणार असून यामध्ये शालेय विद्यार्थी, महिला जेष्ठ नागरिक तरुण-तरुणी तसेच पर्यटकांना प्राध्यान्य देण्यात येणार आहे.     शेतकऱ्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने शासनाने विविध योजना हाती घेतल्या असून आगामी दोन वर्षात शेतकऱ्यांबरोबरच आता शहरातील तरुणांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचा संकल्प व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शहरातील तरुणांना विविध व्यवसाय उद्योगाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यासाठी अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे.     पर्यटनवाढीसाठी कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हल महत्वाचे दालन ठरेल असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पाच दिवसांसाठी आयोजित केलेल्या कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हला किमान 10 लाख पर्यटक भेट देतील. राज्यातील जनतेने विशेषत: शेतकऱ्यांनी कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हल भेट देऊन फुल शेतीतील विकसित तंत्रज्ञान आणि माहिती घ्यावी जेणेकरुन फुल शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नव साधन आणि नव क्षेत्र उपलब्ध होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा फ्लॉवर फेस्टिव्हल भव्य जागेत आनोखा, अदभूत आणि लाखो फुलांचा उत्सव बनला आहे. यातून कोल्हापूरच्या पर्यटन वाढीबरोबरच शेतकऱ्यांसाठी फुलशेतीच नव दालन विकसित करण्या सहाय्यभूत ठरेल असेही ते म्हणाले. या फेस्टिव्हल साठी केएसबीपीच्या सुजय पित्रे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी घेतलेल्या परिश्रामाचे त्यांनी कौतुक केले.     पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हल मधील विविध फुलांच्या दालनांना भेटी देऊन पाहणी केली आणि विविध फुलांचे निर्माण झालेले आकर्षक ताटवे पाहुन समाधान व्यक्त केले.     प्रारंभी चारुदत्त जोशी स्वागत केले, कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पाचे प्रमुख सुजय पित्रे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून कोल्हापूरात पर्यटन वाढीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हलच्या आयोजनामुळे कोल्हापुरात पर्यटनवाढीस मदत होणार असून महाराष्ट्रातील पहिलाच भव्य आणि दिव्य असा हा फेस्टिव्हल साजरा केला जात आहे. यामध्ये दिड लाखांहून अधिक फुलझाडे तर एक लाखाहून अधिक फुले आहेत. यातून फ्लोरिकलचर, तसेच ग्रार्डन विकासासाला नवी दिशा मिळणार आहे. यामध्ये देशी विदेशी पुष्प रचना, पुष्पशिल्पे, फॅशन शो, कला स्पर्धा, प्रदर्शन, चर्चासत्रे, तज्ञांची व्याख्याने आणि संस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी लोकांसाठी उपलब्ध केली आहे.     या कार्यक्रमास निवासराव सांळुखे, पोलीस उपाधीक्षक प्रशांत अमृतकर, माणिक पाटील-चुयेकर, निर्मितीचे अनंत खासबागदार, शिरिष खांडेकर, पणनचे विशेष लेखापरिषक बाळासाहेब यादव, विद्याप्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे, अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, शहरातील नर्सरीचालक आणि नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील