शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

देश-विदेशातील चित्रपटांची मेजवानी उद्यापासून

By admin | Updated: December 19, 2014 00:11 IST

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : राजदत्त, सुधीर नांदगावकरांचा होणार सन्मान; ५० चित्रपट, ४० लघुपट

कोल्हापूर : तिसरा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शनिवार (दि.२०) ते २७ डिसेंबर या कालावधीत येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. ५० चित्रपट व ४० लघुपटांच्या प्रदर्शनातून हा महोत्सव रंगणार आहे. मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांतील व परदेशी चित्रपटांचा यामध्ये समावेश असेल, अशी माहिती कलामहर्षी बाबूराव पेंटर कलादालनचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत जोशी यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त व ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.जोशी म्हणाले, महोत्सवाचा प्रारंभ शनिवारी (दि.२०) सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी दक्षिण कोरिया, फ्रान्स, हंगेरी, तैवान, बांगलादेश, रशिया, इराण, जर्मनी, यु.के., जपान, तुर्कस्तान, बेल्जियम, क्रोएशिया या देशांतील विविध चित्रपट दाखविले जाणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापुरातील ख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणारे तीन चित्रपट, त्यांच्या कारकिर्दीतील पोस्टर्स व चित्रपटातील स्थिरचित्रांचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. विविध भारती या विभागामध्ये कोकणी, मल्याळम्, बंगाली, आसामी, तमिळ, कन्नड भाषांतील चित्रपटांचा समावेश आहे. कंट्री फोकस विभागात चीनमधील तरुण दिग्दर्शकांचे नवीन चित्रपट दाखविले जाणार आहेत. डायरेक्ट फोकसमध्ये ग्रीक दिग्दर्शक कास्टा गॅव्हरास यांचे तीन महत्त्वपूर्ण चित्रपट दाखविले जाणार आहेत. दिग्दर्शक गुलजार यांच्या गौरवार्थ त्यांनी दिग्दर्शित केलेल्या तीन चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. श्रद्धांजली विभागात ‘कागज के फूल’ हा व्ही. के. मूर्ती यांनी चित्रीत केलेला गुरुदत्त यांचा चित्रपट व ब्रिटिश अभिनेता रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांनी दिग्दर्शित ‘क्लोजिंग द रिंग’ हा चित्रपट दाखविला जाईल. माय मराठी विभागामध्ये ‘बरड’, ‘अग्निपंख’, ‘चिअर्स मराठे’, ‘रझाकार’, ‘कॅँडल मार्च’,‘ कापूस कोंड्याची गोष्ट’ आदींसारखे सात अप्रदर्शित चित्रपट प्रेक्षक पसंती पुरस्कारासाठी स्पर्धेत असणार आहेत. शनिवारी (दि.२७) महोत्सवाची सांगता होईल.शनिवारी (दि.२०) सायंकाळी ६ वाजता सिनेअभ्यासक व समीक्षक सुधीर नांदगावकर यांना चित्रतंत्र महर्षी कै.आनंदराव पेंटर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, तर २३ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना अभिनेते दिग्दर्शक नाना पाटेकर यांच्या हस्ते सिनेमा केसरी कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्काराने सन्मानित करणार आहेत.ंया चित्रपटांचे आकर्षणमराठी : अवघाची संसार, धाकटी जाऊ, एक गाव बारा भानगडीप्रादेशिक भाषा : ओडामंडूम , आर्टिस्ट (मल्याळम्), मद्रास (तमिळ), अपूर पांचाळी (बंगाली), खोप (आसामी).चिनी चित्रपट : क्लोज टू दसन, कॅमल कलर, सुपर टायफून, सिटी मंकी, द लास्ट एड वूमन.गुलजार (हिंदी), किताब, अंगूर, अचानक. होस्ट (दक्षिण कोरियन)