गॅसच्या तुटवड्यामुळे कोल्हापुरात उद्योगांची चाके थांबण्याची भीती, उत्पादन प्रक्रियेवर परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:44 IST2026-03-12T12:43:59+5:302026-03-12T12:44:50+5:30

फौंड्री, फॅब्रिकेशन, इंजिनिअरिंग, मेटल कटिंग, वेल्डिंग, कोअर शाॅप तसेच शेती अवजारे तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर एलपीजी गॅसचा वापर केला जातो

Fears of industries coming to a standstill in Kolhapur due to gas shortage, impact on production process | गॅसच्या तुटवड्यामुळे कोल्हापुरात उद्योगांची चाके थांबण्याची भीती, उत्पादन प्रक्रियेवर परिणाम 

गॅसच्या तुटवड्यामुळे कोल्हापुरात उद्योगांची चाके थांबण्याची भीती, उत्पादन प्रक्रियेवर परिणाम 

शिरोली : कोल्हापूरच्या उद्योगांसाठी एलपीजी गॅसचा तुटवडा सध्या ६० टक्केपेक्षा जास्त जाणवत आहे. पुढील चार दिवसांत तो ९० टक्क्यांवर जाण्याची शक्यता उद्योजकांनी वर्तविली आहे. गॅसच उपलब्ध झाला नाही तर कोल्हापुरातल्या उद्योगांची चाके थांबतील, असे उद्योजकांनी सांगितले.

केंद्र सरकारने उद्योगांमध्ये एलपीजी गॅसच्या वापरावर निर्बंध घातल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक उद्योग अडचणीत सापडले आहेत. या निर्णयाचा परिणाम केवळ उद्योगांवरच नाही, तर ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या उद्योगांवरही होऊ लागला असून, उत्पादन प्रक्रियेवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.

जिल्ह्यातील फौंड्री, फॅब्रिकेशन, इंजिनिअरिंग, मेटल कटिंग, वेल्डिंग, कोअर शाॅप तसेच शेती अवजारे तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर एलपीजी गॅसचा वापर केला जातो. या कामांसाठी ऑक्सिजन आणि एलपीजी गॅसचा एकत्रित वापर आवश्यक असतो. त्यामुळे एलपीजी गॅसची कमतरता आणि उपलब्ध होत नसल्याने उत्पादन प्रक्रिया अडचणीत आली आहे आणि त्याचा परिणाम ऑक्सिजन सिलिंडरच्या मागणीवरही होतो.

वाचा: अक्षता पडतील; पण पंगती कशा उठतील?, मेनू बदला अन्यथा मुहूर्त; गॅस टंचाईने लग्न समारंभावर टांगती तलवार

कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ७० ते ८० टक्के उद्योगांमध्ये एलपीजी आणि ऑक्सिजनचा वापर केला जातो. दिवसाला १०० टनपेक्षा जास्त एलपीजी गॅस लागतो. विशेषतः लोखंडी साहित्य कापणे, वेल्डिंग करणे, मशिनरी दुरुस्ती, तसेच विविध प्रकारचे इंजिनिअरिंग घटक तयार करण्यासाठी या दोन्ही गॅसचा वापर अत्यावश्यक मानला जातो. मात्र, सध्या उद्योगांना एलपीजी गॅस मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे अनेक ठिकाणी उत्पादन कमी करावे लागत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

सध्या ६० टक्केपेक्षा जास्त तुटवडा जाणवत आहे. पुढील दोन-तीन दिवसात तो ८० ते ९० टक्क्यांवर जाईल आणि गॅस उपलब्ध झाला नाही तर मात्र उद्योग बंद ठेवण्याची वेळ उद्योजकांवर येईल. - सुनील शेळके, अध्यक्ष, गोशिमा
 

उद्योगांना एलपीजी गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. अनेक उद्योगांमध्ये मेटल कटिंग आणि वेल्डिंग प्रक्रियेसाठी ऑक्सिजन आणि एलपीजी गॅसचा एकत्रित वापर केला जातो. त्यामुळे एलपीजी नसल्यास ऑक्सिजनचा वापरही मर्यादित राहतो. परिणामी, ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या उद्योगांनाही आर्थिक फटका बसत आहे.- राहुल गरगटे, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादार

एलपीजी गॅसच्या कमतरतेमुळे शासनाने रेशनिंग करण्याचे आणि घरगुती वापरासाठी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक वापरावर त्याचा परिणाम होणार आहे. - वीरेंद्र पाटील, सीआयआय अध्यक्ष

जिल्ह्यातील बहुतांश शेती अवजारे, फॅब्रिकेशन आणि इंजिनिअरिंग उद्योगांमध्ये ऑक्सिजन आणि एलपीजी गॅस हे उत्पादन प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या निर्बंधांमुळे उद्योगांना एलपीजी गॅस मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. - रणजीत जाधव, शेती अवजारे उद्योजक

Web Title : एलपीजी की कमी से कोल्हापुर के उद्योगों पर खतरा, उत्पादन प्रक्रिया प्रभावित

Web Summary : कोल्हापुर के उद्योगों को 60% से अधिक एलपीजी की कमी का सामना करना पड़ रहा है, जो 90% तक पहुंच सकती है। इससे फाउंड्री, फैब्रिकेशन, इंजीनियरिंग और ऑक्सीजन सिलेंडर आपूर्तिकर्ता प्रभावित हैं, जिससे उत्पादन बाधित हो रहा है, खासकर धातु काटने और वेल्डिंग के लिए। व्यवसायों को स्थिति बिगड़ने पर बंद होने का डर है।

Web Title : LPG Shortage Threatens Kolhapur Industries, Impacting Production Processes

Web Summary : Kolhapur industries face LPG shortage exceeding 60%, potentially reaching 90%. This impacts foundries, fabrication, engineering, and oxygen cylinder suppliers, disrupting production, especially for metal cutting and welding. Businesses fear closures if the situation worsens.