Kolhapur Crime: संतापजनक! बापानेच केला १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 15:15 IST2025-10-25T15:14:14+5:302025-10-25T15:15:19+5:30
कोल्हापूर : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर नराधम बापाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप-लेकीच्या नात्याला काळीमा ...

Kolhapur Crime: संतापजनक! बापानेच केला १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
कोल्हापूर: पोटच्या १३ वर्षीय मुलीवर नराधम बापाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. करवीर पोलिसांनी नराधम बापाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी आपल्या कुटुंबासह राहत होता. काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्याच मुलीवर अत्याचार केले. ही बाब उघडकीस आल्यानंतर तात्काळ करवीर पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी तातडीने संशयित आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.