शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
3
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
4
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
5
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
6
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
7
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
8
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
9
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
10
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
11
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
12
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
13
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
14
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
15
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
16
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
17
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
18
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
19
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
20
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव

कोल्हापुरातील गुंड चिन्या हळदकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तरुणावर जीवघेणा हल्ला, चौघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 12:04 IST

दौलतनगर परिसरातील टोळीयुद्धाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे पोलिसांसमोर आव्हान

कोल्हापूर : पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार चिन्या ऊर्फ संदीप हळदकर याच्या खुनाचा बदला घेण्याचा प्रकार रविवारी (दि. १२) रात्री बागल चौक परिसरातील नारायण बाग येथे घडला. चौघांनी केलेल्या हल्ल्यात संदीप बाळू खोत (वय ३२, रा. दौलतनगर, कोल्हापूर) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामा कुऱ्हाडे, अमित दिंडे, चैतन्य दिंडे आणि करण सावंत अशी गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.यादवनगर येथील सराईत गुंड आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार चिन्या हळदकर याचा सप्टेंबर २०२२ मध्ये यादवनगरात निर्घृण खून झाला होता. दौलतनगर परिसरातील काही तरुण हळदकर याला दगडाने ठेचून पळून गेले होते. त्या घटनेपासून हळदकर टोळीतील गुंड दौलतनगरातील हल्लेखोरांवर डौख धरून होते.

दौलतनगरातील संदीप खोत याच्यासोबत वावरणाऱ्या काही तरुणांवर हल्लेखोरांचा राग होता. यातून त्यांनी रविवारी रात्री संदीप खोत याला फोन करून नारायण बाग येथे बोलावून घेतले. त्यानंतर रामा कुऱ्हाडे आणि इतरांनी एडक्यासह धारदार हत्याराने त्याच्यावर जीवघेणा हल्ला करून पलायन केले. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. यादवनगर, दौलतनगर परिसरातील टोळीयुद्धाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.हल्लेखोर सराईत गुन्हेगारसंदीप खोत याच्यावर हल्ला करणाऱ्या चार आरोपींपैकी तिघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अमित दिंडे याच्यावर दोन, चैतन्य दिंडे याच्यावर चार, तर करण सावंत याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी चारही हल्लेखोरांना रविवारी रात्री उशिरा ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Revenge killing attempt; youth attacked, four booked.

Web Summary : In Kolhapur, a youth was brutally attacked in retaliation for Chinya Haladkar's murder. Four suspects, including repeat offenders, have been arrested by Shahupuri police, raising concerns about gang wars.