शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अडत जाऊनही शेतकरी अडकित्त्यातच!

By admin | Updated: September 5, 2016 00:24 IST

भाज्यांच्या दरात घसरण : अडतचे पैसे दरात काढण्याचा खरेदीदारांचा डाव

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर राज्य सरकारने शेतकऱ्यांना अडतीच्या जोखडातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला, पण जाणीवपूर्वक खरेदी दर पाडण्याचे प्रकार सुरू असल्याने अजूनही शेतकरी अडकित्त्यातच आहे. जून महिन्याच्या तुलनेत सध्या भाज्यांची आवक जास्त असल्याने दरात घसरण झाल्याचे म्हटले तरीही तुलनात्मक दर प्रतिक्विंटल ५२३ रुपयांनी कमी झाल्याने ‘भीक नको, पण कुत्रे आवर’ म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बाजार समित्यांमध्ये भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा या नाशवंत मालासाठी ६ टक्के अडत शेतकऱ्यांकडून वसूल केली जात होती; पण अडतच्या जोखडातून शेतकऱ्यांची मान सोडविण्यासाठी ५ जुलैपासून राज्य सरकारने अडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून वसूल करण्याचा फतवा काढला. त्याला खरेदीदारांनी कडाडून विरोध केला, पण सरकार व बाजार समित्याही ठाम राहिल्याने सध्या अडत खरेदीदारांकडूनच वसुली सुरू आहे. अडतचे पैसे दरातून काढण्याचा प्रकार विशेषत: भाजीपाला मार्केटमध्ये अधिक सुरू आहे. अडतचे पैसे गृहीत धरूनच खरेदीदार सौद्यात बोली लावत असल्याने जून ते आॅगस्ट या महिन्यातील भाज्यांचे दर तुलनात्मक पाहिले तर फरक दिसतो. कोल्हापूर बाजार समितीत जून महिन्यात ६८ हजार २६१ क्विंटल फळे-भाजीपाल्याची आवक झाली आहे. या महिन्यात सरासरी प्रतिक्विंटल १९५१ रुपये दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. जुलैमध्ये अडत घेण्यास सुरुवात केल्याने खरेदीदारांनी संप केला, त्यात जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटलीच पण फळ मार्केट ओस पडले होते. परिणामी दोन्हींची आवक ४८ हजार ७२ क्विंटल झाली. या महिन्यातील सरासरी दर १७०३ रुपये राहिला. शेतकऱ्यांकडून अडत वसूल करणे हे चुकीचे आहेच, पण हमीभावासाठी सरकार काय करणार हे महत्त्वाचे आहे. पूर्वी ६ टक्क्यांप्रमाणे भाजीपाल्यासाठी प्रतिकिलो २.४० रुपये अडत बसते, पण सध्याचा भाजीपाल्याचा दर पाहता प्रतिकिलो ५.२३ रुपये दर कमी झाला आहे. त्यामुळे शेवटी नुकसान शेतकऱ्यांनाच सोसावे लागत आहे. केवळ ७४८ क्विंटल आवकेत वाढ आॅगस्टमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाल्याचा कांगावा सुरू असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. जूनच्या तुलनेत आॅगस्टमध्ये दिवसाला सरासरी ७४८ क्विंटल भाजीपाला वाढला आहे. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर ही आवक योग्यच होती. त्यामुळे प्रतिक्विंटल सव्वापाचशे रुपये दरात घसरण होणे रास्त आहे काय? असा सवाल शेतकऱ्यांमधून होत आहे. अडते नरमले! पूर्वी शेतकऱ्यांकडून अडत मिळत होती, त्यावेळी अडते जादा दरासाठी चढाओढ करायचे. आता खरेदीदारांकडूनच अडत मिळणार असल्याने त्यांना दुखाविण्याच्या मानसिकतेत अडते नाहीत. भाजीपाला हा कच्चा माल आहे असल्याने त्याला नियमन मुक्त करणे चुकीचे ठरणार आहे. नियमनात घेतले तरच स्पर्धा होऊन शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे अधिक जाऊ शकतात. - विश्वास पाटील, सदस्य, महालक्ष्मी भाजीपाला असोसिएशन तीन महिन्यांत तुलनात्मक दरदाम महिना फळे/भाजीपाला प्रतिक्विंटल आवक क्ंिवटलमध्ये दर रुपयांत जून ६८ हजार २६१ १९५१ जूलै ४८ हजार ७२ १७०३ आॅगस्ट ७१ हजार ८९७ १४२८ ‘भाऊ’ दराकडे लक्ष देणार का? पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना अडत मुक्त केले, पण गेले दोन महिने कोसळणाऱ्या दराकडे त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. आवक वाढल्याच्या नावाखाली भाजीपाला कवडीमोल दराने शेतकऱ्यांना विकावा लागत आहे.