Kolhapur: उसाचा ट्रक अंगावर उलटल्याने शेतकरी जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 15:59 IST2025-01-08T15:57:18+5:302025-01-08T15:59:12+5:30
चंदगड : उसाचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात शेतकरी त्याखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना तुडीये-कोलीक रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी मळवी ...

Kolhapur: उसाचा ट्रक अंगावर उलटल्याने शेतकरी जागीच ठार
चंदगड : उसाचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात शेतकरी त्याखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना तुडीये-कोलीक रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी मळवी येथे घडली. मंगेश रामू पाटील (वय ५८, रा. मळवी), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मंगळवारी मंगेश रताळी काढणीचे काम करून घरी परत येत होते. त्याचदरम्यान तुडीये-कोलीक रस्त्यावरून उसाने भरलेला ट्रक इको-केन शुगर्स कारखान्याच्या दिशेने जात होता. मळवी फाट्यावर ट्रक येताच अचानक ट्रक उलटला. त्यामध्ये मंगेश दुचाकीसह अडकले. ऊस पूर्ण अंगावर पडल्याने गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
वातावरण तणावपूर्ण
तुडीये-कोलीक रस्ता अरुंद असून, याच रस्त्यावरून कारखान्याच्या वाहनांचीही मोठी वर्दळ असल्याने वरचेवर अपघात होत आहेत; पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानेच अनेक जणांनी जीव गमावला आहे. त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी आल्याशिवाय मृतदेह काढू देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.