Kolhapur: कोपार्डे येथे शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:59 IST2025-08-21T16:59:00+5:302025-08-21T16:59:00+5:30
शेतात वैरणीसाठी गेले होते

Kolhapur: कोपार्डे येथे शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू
कोपार्डे : कोपार्डे (ता. करवीर) येथे शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. सर्जेराव श्रावण कांबळे (वय ६७) असे त्यांचे नाव आहे. घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी सर्जेराव कांबळे हे शेतात वैरणीसाठी गेले होते. ते घरी आले नसल्याने पत्नी मंगल कांबळे चौकशी करत ज्या शेताकडे ते गेले होते त्या बाजूला गेल्या. शेताजवळ आलेल्या नदीच्या पुराच्या पाण्यात सर्जेराव यांचा मृतदेह तरंगताना दिसला.
करवीर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह कोल्हापूर येथे विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या पश्चात पत्नी माजी सरपंच मंगल कांबळे, दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.