शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल ॲपवरून शेतीचे व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:55 IST

सेनापती कापशी : शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. या उद्देशाने हसुर बुद्रुक (ता. कागल) येथील प्रगतिशील ...

सेनापती कापशी : शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. या उद्देशाने हसुर बुद्रुक (ता. कागल) येथील प्रगतिशील शेतकरी गिरीश कुलकर्णी यांनी गेली पाच वर्षे विविध प्रयोग राबवून "अंकुर फार्मसीस च्या नावाने मोबाईलवरून शेतीचे नेटके नियोजन करता येईल, असे ॲप तयार केले आहे. याचा सर्वप्रथम वापर त्यांनी स्वतः केला आहे. शनिवारी, दि. ५ रोजी या मोबाईल ॲपचे उद्‌घाटन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते, जिल्हा व तालुका कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

बदलते हवामान, पिकावर होणारी कीड व रोगांचा प्रादुर्भाव, झपाट्याने बदलणारे शेतीचे स्वरूप अशा अनेक कारणांमुळे शेती व्यवसायात अनेक आव्हाने शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहेत.

या सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी शेती हा एक व्यवसाय म्हणून स्वीकारला पाहिजे. हा व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी व्यावसायिक शेतीची कास धरली पाहिजे. बाजारात ज्या पिकांची मागणी आहे अशीच पिके आपल्या शेतात घेतली पाहिजेत. हे सर्व करत असताना शेतकऱ्यांनी पिकावर व शेतावर होणाऱ्या खर्चावर नियंत्रणदेखील ठेवणे फार महत्त्वाचे आहे. यासाठी त्यांना दीपक पाटील, राम फडतरे व गौरी कंटक यांनी सहकार्य केले आहे. ॲप विकसित करण्यासाठी मोठा आर्थिक लोड आला असला तरी हे ॲप शेतकऱ्यांना मोफत मिळणार आहे असे कुलकर्णी यांनी सांगितले.

शेती व्यवस्थापन ॲपमध्ये हवामान, माती परीक्षण, माझे प्लाॅट, माझे रोपण, माझा क्रियाकलाप, माझे कामगार, कर्मचारी उपस्थिती, कर्मचारी वेतनपट, माझा साठा, साठा वापर, माझे पीक, माझी पीक विक्री, माझे उत्पन्न, माझा खर्च, अहवाल, आदी मेनूच्या माध्यमातून अतिशय सोप्या पद्धतीने शेतीच्या सर्व नोंदी ठेवता येतात. शेतकऱ्यांना समजेल अशा भारतातील कोणत्याही भाषेत हे ॲप वापरता येते.

फोटो : १) गिरीश कुलकर्णी