शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

फॅन्सीचे फॅड; दुचाकीस्वार मोकाट

By admin | Updated: July 13, 2015 00:31 IST

वाहतूक पोलिसांचा कारवाईचा धडाका : सहा महिन्यांत १५७३ वाहनधारकांना १ लाख ५९ हजारांचा दंड

कोल्हापूर : वाहतूक नियंत्रण शाखेने शहरात विविध कारवायांचा धडाका लावला असला तरी कोल्हापूरकरांचे फॅन्सी नंबरचे ‘फॅड’ आजही कायम असल्याचे दिसते. शहरात शनिवारी व रविवारी ‘लोकमत’चे प्रतिनिधी व छायाचित्रकारांनी विविध ठिकाणी फिरून पाहणी केली. विशेषत: तरुण वर्गाच्या डोक्यातून वाहनांना फॅन्सी नंबर प्लेटचे फॅड अजूनही गेलेले दिसले नाही. दुसरीकडे, फॅन्सी नंबर प्लेटवर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाईचे हत्यार उपसले आहे. पोलिसांचे कारवाईचे धाडसत्र सुरू असले तरीही, दुचाकीस्वार बिनधास्तपणे ‘मोकाट’ फिरताना दिसून येत आहेत.शहरात झालेल्या चेन स्नॅचिंग, चोरी, घरफोडी, आदी प्रकरणांमध्ये दुचाकींचा वापर होताना पोलीस तपासामध्ये स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे चोरी प्रकरणामध्ये विनानंबर प्लेटच्या दुचाकींचा वापर होतो. कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी विनानंबर व फॅन्सी नंबर प्लेट दुचाकी, चारचाकी वाहनांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला. १ जानेवारी ते ३० जून २०१५ या कालावधीत वाहनांना विहित नमुन्यात नंबर प्लेट न लावणे अशा एकूण १५७३ प्रकरणांवर कारवाई करून एक लाख ५९ हजार रुपये दंड वसूल केला; तरीही कोल्हापूरकरांचे फॅन्सी नंबर प्लेटचे फॅड गेले नसल्याचे दिसते.शहरात रोज विविध कारवायांचे सत्र सुरू आहे. फॅन्सी नंबर प्लेट व विनानंबर वाहने असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू. - आर. आर. पाटील,पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण, शाखा कोल्हापूर.१) कोल्हापुरातील गंगावेश परिसरात एका दुचाकीस्वाराने छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेली नंबर प्लेट लावलेली होती. २) नंबर प्लेटवर ‘एक सात १३’ लिहून दुचाकीस्वाराने नियमाचा भंग केला आहे. ३) दुचाकीस्वाराने ‘आर’ लिहिलेला आहे की १२ नंबर घातला आहे, हे समजत नाही. त्यामुळे ‘हा नंबर ओळखून दाखवा,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. ४) नंबर प्लेटवर पांढऱ्या रंगानेच नंबर घातला जातो. मात्र, या दुचाकीस्वाराने हा नियम धाब्यावर बसवून चक्क लाल रंगाने नंबर घातला आहे. ५) काही तरुणांना आपल्या दुचाकीला केवळ मोकळी नंबर प्लेट लावण्यातच मजा वाटते. ६) ‘मी राजा, मला कोण अडवणार?’ असे तर हा दुचाकीस्वार सांगत नसेल ना?