शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘मेड इन कोल्हापूर’ राज्यात फेमस

By admin | Updated: August 26, 2014 23:56 IST

गणराजाचे वेध : लालबागचा राजा, पाटील पोटल्या, दगडूशेठ यांना मागणी

कोल्हापूर : यंदा ‘लालबागचा राजा’, ‘पाटील पोटल्या’ आणि ‘दगडूशेठ’ या मूर्तींना मोठी मागणी आहे. पेण (रायगड) येथील मूर्तींपाठोपाठ ‘मेड इन कोल्हापूर’च्या मूर्तीही आता राज्याबरोबरच गोवा, कर्नाटकमध्येही दाखल होण्यास सज्ज झाल्या आहेत. गणराजाचे आगमन केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. कुंभारवाड्यात काही मूर्ती रंगकामासह मंडपात जाण्यासाठी सज्ज आहेत, तर काही मूर्तींचे रंगकाम आणि अखेरचा हात मारण्याचे काम सुरू आहे. राज्याबरोबर देशभरात पेण (रायगड) येथील गणेशमूर्तींना मोठी मागणी असते. यंदा या मागणीत थोडी घट झाली आहे; कारण कोल्हापुरातील मूर्ती आकर्षक रंगसंगती, सुबक कोरीव काम आणि दणकट असल्याने त्यांना मागणी वाढली आहे. राज्यात ‘लालबागचा राजा’ या मूर्तीस मोठी मागणी आहे. तशा हुबेहूब मूर्ती कोल्हापुरातही साकार केल्या जात आहेत. त्यामुळे या मूर्तीचा पेटंट असला तरी त्यात किरकोळ बदल करून अनेक मूर्ती कोल्हापुरातील शाहूपुरी, गंगावेश कुंभार गल्ली, जाधववाडी-बापट कँप येथील कुंभारवाडा या ठिकाणी तयार करण्यात आल्या आहेत. या मूर्तींची उंचीही साधारण अकरा फूट इतकी आहे. या मूर्तीबरोबरच सात फुटी पाटील पोटल्या मूर्तींनाही मागणी वाढली आहे. ही मूर्ती केवळ कोल्हापुरातच केली जाते. या मूर्तींना पंढरपूर, सांगोला, सोलापूर व कर्नाटकातील काही भागांत मोठी मागणी आहे. (प्रतिनिधी)हुबेहूब चित्रात दाखविल्याप्रमाणे मूर्ती बनविण्याचे कसब माजगावकर बंधू, श्रीकांत माजगावकर, सर्जेराव निगवेकर, उदय कुंभार, संतोष खुपेरकर, संदीप वडणगेकर, सागर येळावडेकर, आदी मूर्तिकारांमध्ये आहे. कोणतेही गणेशाचे चित्र दाखविल्यानंतर ही मंडळी २१ फूट, ११ फूट आणि ७ फूट किंवा सांगाल त्या उंचीप्रमाणे मूर्ती बनवून देतात. त्यामुळे त्यांनी साकारलेल्या या वेगळ्या मूर्तींनाही राज्यभरातून मोठी मागणी आहे.यंदा कच्चा माल महागल्याने वीस टक्क्यांनी मूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे. मोठ्या मूर्तींना ‘गबाळ गाठ’ म्हणून जे मटेरियल लागते, ते यंदा मोठ्या प्रमाणात महाग झाले आहे. प्लास्टरही महागले आहे. साहजिकच मूर्तीही महागल्या आहेत. - सुरेश गणपतराव माजगावकर, ज्येष्ठ मूर्तिकार, कोल्हापूर