शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

कोल्हापुरात तोतया पत्रकाराने उकळली तीन लाखांची खंडणी, विक्रेत्यास धमकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 12:15 IST

आठ ते दहा जणांवर गुन्हा, एक ताब्यात

कोल्हापूर : तोतया पत्रकार अन्सार रफिक मुल्ला (रा. कोल्हापूर) याने लक्ष्मीपुरीतील प्लास्टिक विक्रेत्यास कारवाई करण्याची भीती घालून तीन लाख रुपयांची खंडणी उकळली, तसेच त्याचा साथीदार अजित पांडुरंग पवार (वय ४७, रा. बिंदू चौक) याने पाच लाखांची मागणी करून विक्रेत्यास जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सोमवारी (दि. ७) घडला.याबाबत विक्रेते सनी शंकरलाल दर्डा (वय ३५, रा. गांधीनगर) यांनी बुधवारी (दि. ९) लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित मुल्ला, पवार आणि मयूर ऊर्फ गणेश मोहन कांदळकर (४०, रा. रविवार पेठ) या तिघांसह अनोळखी सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल केला. यातील अजित पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास तोतया पत्रकार अन्सार मुल्ला हा सात ते आठ अनोळखी तरुणांसह लक्ष्मीपुरीतील पान लाइन येथील अमृत प्लास्टिक या दुकानात घुसला. मोबाइलवर चित्रीकरण घेत त्याने दुकान सील करण्याची धमकी दिली.बेकायदेशीर प्लास्टिक विक्री करीत असल्याबद्दल तुमची बातमी करणार. त्यानंतर तुमच्या दुकानाला टाळे लागणार. यापूर्वी आम्ही गांधीनगरातील दुकानांच्या बातम्या केल्यानंतर अनेक दुकाने बंद झाली आहेत, अशी भीती घातली. कारवाई टाळण्यासाठी एका तासाच्या आत पाच लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. पैसे दिले नाहीत तर जिवे मारू, असे धमकावले. त्यानंतर काही वेळाने तीन लाख रुपये घेऊन मुल्ला निघून गेला.दुसऱ्या दिवशी दुसरी टोळीमुल्ला याने तीन लाख रुपये उकळल्यानंतर दुसऱ्या दिवशी बिंदू चौकातील अजित पवार हा दर्डा यांच्या दुकानात गेला. त्याने पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने पवार याला अटक केली. मुल्ला याच्या सांगण्यावरून खंडणी मागण्यासाठी गेल्याचे पवार याने पोलिसांना सांगितले.

अनेकांना गंडागुन्हा दाखल झाल्याचे समजताच मुल्ला पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोर्टल आणि यूट्यूबवर बातम्या देणाऱ्या काही तोतया पत्रकारांनी शहरातील अनेकांना गंडा घातल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधितांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीJournalistपत्रकारPoliceपोलिस