शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील यांचे पद अडचणीत

By admin | Updated: July 5, 2015 00:55 IST

जिल्हा बँक : निवडीस आव्हान देण्याच्या हालचाली

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तज्ज्ञ संचालक प्रा. जयंत पाटील यांचे पद अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्या निवडीला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या एका आदेशाचा आधार घेतला जात आहे. महापालिका निवडणुकीतील जोडण्या करण्यासाठी त्यांना जयंत पाटील यांची गरज आहे. त्यामुळे त्यांना सत्तेचे पद असावे, म्हणून बँकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असतानाही त्यांना आता तज्ज्ञ संचालक म्हणून मागील दाराने बँकेत घेतले आहे. त्यांच्या निवडीला पतसंस्था गटातून पाटील यांचाच पराभव करून विजयी झालेले अनिल पाटील यांनी विरोध केला आहे. नुसता संचालक मंडळामध्ये विरोध करून न थांबता त्याविरोधात तक्रार करण्याचे त्यांनी ठरविले आहे. तज्ज्ञ संचालक नियुक्ती कशी करावी, यासाठी रिझर्व्ह बँकेने ५ एप्रिल २००२ ला काही मार्गदर्शक सूचना घालून दिल्या आहेत. त्यानुसार बँकेच्या संचालक मंडळावर दोन तज्ज्ञ संचालक घेता येतात. परंतु, त्यांनी बँकेच्या व्यवस्थापनाच्या मधल्या फळीत काम केल्याचा दहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचे व्यावसायिक शिक्षण म्हणजे सीए, आयसीडब्लू, सीएस किंवा निवृत्त बँक अधिकारी अथवा बँकिंगसंबंधी प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक हवेत. ‘केडीसीसी’ ही जिल्हा म्हणजे फेडरल बँक आहे. त्यामुळे हा आदेश लागू होतो का, यासंबंधी संदिग्धता आहे. (प्रतिनिधी)