शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

‘भूविकास’च्या परतफेडीला मुदतवाढ

By admin | Updated: July 28, 2015 23:34 IST

कोल्हापूर शाखेच्या आशा पल्लवीत झाल्या असून, थकीत कर्जाच्या वसुलीला गती आली आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बॅँकेच्या थकबाकीदारांसाठी शासनाने एकरकमी परतफेड योजनेस (ओटीएस) मार्च २०१६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे बॅँकेच्या थकीत कर्जदारांना मोठा फायदा होणार असून, त्या माध्यमातून बॅँकेच्या वसुलीला गती मिळणार आहे. राज्य सरकारने भूविकास बॅँका अवसायनात काढण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयातून कोल्हापूर शाखेस वगळण्यात आले असून, याबाबतचा निर्णय जिल्हा उपनिबंधक यांच्यावर सोपविण्यात आला आहे. बॅँकेचा ताळेबंद पाहून निर्णय घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूर शाखेच्या आशा पल्लवीत झाल्या असून, थकीत कर्जाच्या वसुलीला गती आली आहे. या बॅँकेच्या थकबाकीदारांसाठी सरकारने सप्टेंबर २००७ मध्ये एकरकमी परतफेड योजना सुरू केली. त्यातून बऱ्यापैकी वसुलीही झाली. सरकारने सातत्याने मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे प्रयत्न केले. मार्च २०१४ ला या योजनेची मुदत संपली होती. त्यानंतर बॅँकेच्या अस्तित्वाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने मुदतवाढ दिली नाहीच; पण वसुलीही ठप्प झाली होती. भूविकास बँकेच्या कोल्हापूर शाखेची जबाबदारी शासनाने जिल्हा उपनिबंधक यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे बॅँक पुन्हा सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. थकीत कर्जाची वसुली व्हावी, यासाठी एकरकमी परतफेड योजना पुन्हा राबविण्याची मागणी बॅँकेच्यावतीने करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने मार्च २०१६ पर्यंत त्याला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या योजनेला राज्यात कर्जदारांकडून कितपत सहकार्य मिळेल यावर बँकेचे भवितव्य अवलंबून आहे.शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बॅँकेचे अध्यक्ष एम. एम. पाटील, व्यवस्थापक व्ही. बी. मोहिते यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे. मार्च २०१६ अखेर या योजनेत सहभागी होऊन कर्जमुक्त न होणाऱ्या थकबाकीदारांवर वसुलीची पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांचा असा होणार फायदामार्च २००४ अखेर येणे असलेल्या मुद्दल रकमेवर सहा टक्के सरळव्याज दराने आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण थकबाकीच्या निम्म्यापेक्षा कमी रक्कमच शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.