शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

‘सेफ सिटी’च्या त्रुटी उघड

By admin | Updated: July 2, 2016 00:37 IST

‘स्थायी’ सदस्यांची पाहणी : कॅमेऱ्यातील चित्रे अस्पष्ट

कोल्हापूर : तब्बल साडेसात कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या सेफ सिटी प्रकल्पाच्या कामाची शुक्रवारी महानगरपालिका स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांच्यासह काही सदस्यांनी पाहणी केली. यावेळी अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे अनेक कॅमेरातून घेतलेली चित्रे अस्पष्ट दिसत असल्याचे सभापती जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महानगरपालिका स्थायी समितीची सभा शुक्रवारी दुपारी सभापती जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत शहरात राबविण्यात आलेल्या सेफ सिटी प्रकल्पातील कामाच्या चुकांबाबत जोरदार चर्चा झाली. सदस्यांच्या आग्रहाखातर या प्रकल्पाची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेचे कामकाज संपवून या प्रकल्पाची सभापतींसह सदस्यांनी पाहणी केली. राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, नगरसेवक अजित ठाणेकर, नगरसेविका दीपा मगदूम, रिना कांबळे, जयश्री चव्हाण, सूरमंजिरी लाटकर, शोभा बोंद्रे, रूपाराणी निकम, मनिषा कुंभार आदींनी ही पाहणी केली. त्यांना पोलिस निरीक्षक भांबुरे यांनी माहिती दिली. शहरात बहुतांशी चौकात कॅमरे सिग्नलवर बसविण्यात आले आले आहेत. वास्तविक पोलिसांच्या सूचनेप्रमाणे ते रस्त्याच्या मध्यभागी बसविणे आवश्यक होते. ३६० अंशातील छायाचित्रे टिपणारा कॅमेराही रस्त्याच्या एका बाजूला बसविल्यामुळे ते केवळ १८० अंशातच चित्रे टिपतो. त्यामुळे ते पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत ही बाब यावेळी उघडकीस आली आहे. काही कॅमेऱ्यांनी टिपलेली छायाचित्रे झूम करून पाहिल्यावर व्यक्तींचे चेहरे फाटलेले दिसतात. वाहनांचे क्रमांक अस्पष्ट दिसतात, असे सभापती जाधव यांनी सांगितले. सेफ सिटी प्रकल्पाच्या नियंत्रण कक्षात बसविण्यात आलेल्या साध्या टीव्ही स्क्रीनच्याऐवजी एलईडी स्क्रीन बसविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. काही मोजके कॅमेरे पूर्ण क्षमतेने काम करतात हे दिसून आले, असेही जाधव यांनी सांगितले. शुक्रवारी पदाधिकारी व नगरसेवकांनी केलेल्या पाहणीवेळी महत्त्वाच्या त्रुटी समोर आल्यामुळे हा प्रकल्प आणखीन गोत्यात आला आहे. (प्रतिनिधी) पाहणीत या गोष्टी आढळल्या...वास्तविक पोलिसांच्या सूचनेप्रमाणे रस्त्याच्या मध्यभागी कॅमेरे बसविणे आवश्यक होते३६० अंशातील छायाचित्रे टिपणारा कॅमेराही रस्त्याच्या एका बाजूला बसविल्यामुळे तो केवळ १८० अंशातच चित्रे टिपतो. काही कॅमेऱ्यांनी टिपलेली छायाचित्रे झूम करून पाहिल्यावर व्यक्तींचे चेहरे फाटलेले दिसतातसेफ सिटी प्रकल्पाच्या नियंत्रण कक्षात बसविण्यात आलेल्या साध्या टीव्ही स्क्रीनच्याऐवजी एलईडी स्क्रीन बसविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले.