शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महाडिकांना निवडणुकीत हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

कुरुंदवाड : गोकूळ दूध संघात टँकरच्या माध्यमातून स्वत:चा धंदा करणाऱ्या महाडिकांना या निवडणुकीत हद्दपार करा, ठरावधारक मतदार सुज्ञ असून ...

कुरुंदवाड : गोकूळ दूध संघात टँकरच्या माध्यमातून स्वत:चा धंदा करणाऱ्या महाडिकांना या निवडणुकीत हद्दपार करा, ठरावधारक मतदार सुज्ञ असून या निवडणुकीत गोकूळमध्ये निश्चितच परिवर्तन करतील, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

येथील जैन सांस्कृतिक भवनात गोकूळ दूध संघाच्या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या निवडणूक प्रचारास प्रारंभ झाला. यावेळी मंत्री पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील होते. यावेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील प्रमुख उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, दूध उत्पादक शेतकऱ्याला दुधाला दोन रुपये जादा दर मिळावा व संघातील महाडिकांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रामाणिक संघर्ष करत आहोत. त्यामुळे आमचा लढा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी असल्याने सत्ताधारी गटातील मातब्बर संचालक आमच्या लढ्यात सहभागी झाले आहेत. संघाच्या गत निवडणुकीत आम्हाला निसटता पराभव पत्करावा लागला. मात्र, गेल्या पाच वर्षात दूध दरवाढीसाठी, मल्टीस्टेटचा निर्णय रद्द करण्यासाठी रान उठविले. मल्टीस्टेटचा निर्णय रद्द झाल्यामुळेच आज सभासदांना किंमत आली असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील यांनी दूध संघात लोकशाही प्रस्तापित करण्यासाठी आणि स्पर्धेच्या युगात गोकूळ टिकविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळी एकत्र आल्याचे सांगत सत्तांतर होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री यड्रावकर म्हणाले, तालुक्यात १३४ सभासद असताना सत्ताधारी गटाकडून उमेदवारी डावलली जात आहे. या निवडणुकीत परिवर्तन होणारच आहे. मात्र, सत्तेत आल्यानंतर आगामी काळात शिरोळ तालुक्याला संधी मिळावी. शिवाय इतर दूध संस्थांना सभासद करून घेतल्यास दूध संकलन दोन लाखाच्या पुढे नेऊ, असे स्पष्ट करून तालुक्यातून निर्णायक मते मिळवून देण्याचा विश्वास दिला.

यावेळी माजी खासदार निवेदिता माने, गोकूळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, दिलीप पाटील यांची भाषणे झाली.

सभेस नगराध्यक्ष जयराम पाटील, अमरसिंह पाटील, अरुण नरके, बाबासाहेब पाटील, प्रकाश पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, वैभव उगळे उपस्थित होते. स्वागत गणपतराव पाटील तर माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी आभार मानले.

फोटो - २२०४२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - कुरुंदवाड येथे गोकूळ निवडणुकीच्या प्रचार सभेत पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले.