शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: July 26, 2015 00:42 IST

कुलूप लावण्याची वेळ : एलबीटी निर्णयानंतर उत्पन्नाला फटका; केवळ १७ व्यापारीच पात्र

भारत चव्हाण, कोल्हापूर : पन्नास कोटींच्या आत ज्या व्यापारी व उद्योजकांची वार्षिक उलाढाल आहे, अशा सर्वांना एलबीटी माफ करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारापर्यंत राज्य सरकार पोहोचले असले तरी असा निर्णय घेणे म्हणजे महानगरपालिकांच्या अस्तित्वाला सुरूंग लावण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया समाजातून व्यक्त होत आहे. उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेला एलबीटी अशाप्रकारे रद्द करण्याचा जर सरकारने निर्णय घेतलाच, तर मात्र महानगरपालिकांना कुलूप लावण्याची वेळ येईल, अशी भीतीही व्यक्त केली जाते. राज्य सरकारने शुक्रवारी एलबीटी कायद्यातील बदलाबाबत अधिसूचना काढली असून, एक महिन्यात त्यावर हरकती सादर करायच्या आहेत. सरकारने अधिसूचना प्रसिद्ध केली असली तरी त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. महापालिका यंत्रणा मोडण्याचा हा प्रयत्न असल्याचा आक्षेपही घेतला जातो. महानगरपालिका कार्यक्षेत्रात आधी जकात होती, परंतु जकातीची प्रक्रिया त्रासदायक आणि कालबाह्य ठरत असल्याचा दावा करीत व्यापारी व उद्योजक वर्गाने त्यास विरोध केला. त्यामुळे जकातीला एलबीटीचा पर्याय स्वीकारला गेला, परंतु एलबीटी कायदा हा थोडा अधिक कडक असल्याने व्यापाऱ्यांनी त्यालाही विरोध केला. गेली तीन वर्षे त्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या पराभवातील ते एक कारण ठरले. भाजप, शिवसेना नेत्यांनी एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते, त्याची अंमलबजावणी करताना त्यांच्याही तोंडाला फेस आला आहे. व्यापाऱ्यांनी जकात अथवा एलबीटी द्यायला कधीच विरोध केला नाही, परंतु त्याच्या वसुलीची प्रक्रिया आणि कायद्यातील क्लिष्ट तरतुदी यामुळे दोन्ही करांना विरोध झाला. त्यासाठी व्हॅटमध्ये एक टक्का सरचार्जचा पर्याय पुढे आणला, परंतु असा सरचार्ज आकारणे तांत्रिकदृष्ट्या सरकारला शक्य झाले नाही. त्यामुळे एलबीटी व्यापारी आणि राज्य सरकारचीही डोकेदुखी ठरली, परंतु व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला. अखेर राज्य सरकार नमले आणि ५० कोटींच्या आतील उलाढाल असणाऱ्यांना एलबीटीमुक्त करण्याचा निर्णय घेण्यापर्यंत सरकार पोहोचले आहे.