शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

एक जरी टोल रद्द केला, तरी सत्कार करूनी

By admin | Updated: February 25, 2015 00:38 IST

नीतेश राणे : स्वाभिमान संघटनेची कोल्हापुरात स्थापना, सत्ताधाऱ्यांवर कडवी टीका

कोल्हापूर : सत्तेवर आल्यानंतर कोल्हापूरसह राज्य टोलमुक्त करू, असे आश्वासन दिलेले आताचे सरकार अजून राज्यातील एकही टोल रद्द केलेले नाही. नव्याने टोल सुरू करत आहेत. एक जरी टोल रद्द केला, तरी सत्ताधाऱ्यांचे ‘स्वाभिमान’तर्फे नागरी सत्कार करू, असे आव्हान स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार नीतेश राणे यांनी दिले.स्वाभिमान संघटनेच्या स्थापनेनिमित्त मंगळवारी दसरा चौकात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. जयेश कदम अध्यक्षस्थानी होते. आमदार राणे म्हणाले, शिवसेना अनेक वर्षांपासून मराठीच्या नावाने गळा काढत आहे. आता सत्तेत आहे, ‘सामना’ऐवजी त्यांनी आता विधिमंडळात ओरडावे. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारवर ३०२ खाली (खुनाचा) गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. आता फडणवीस मुख्यमंत्री असलेले सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यात ९३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रातील महत्त्वाची शासकीय कार्यालये आणि उद्योग गुजरातला स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सचिन तोडकर यांनी स्वागत केले. सम्राट महाडिक यांनी प्रास्ताविक केले. ‘स्वाभिमान’चे रम्मी रजपूत, मनोज कदम, सिद्धार्थ वानखेडे, सतीश चव्हाण यांची भाषणे झाली. अशोक पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)पुरोगामी महाराष्ट्राला डाग...अ‍ॅड. गोविंद पानसरे यांची हत्या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला डाग आहे. दाभोलकर यांच्या हत्येनंतर मारेकरी सापडत नसल्याने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा राजीनामा मागणारे आताचे मुख्यमंत्री फडणवीस काय करणार? असेही राणे म्हणाले.