शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी नाकारली तरी कन्हैयाकुमारची आज सभा होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:13 IST

कोल्हापूर : कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत कन्हैयाकुमारच्या आज शनिवारी दसरा चौकात होणाऱ्या जाहीर सभेला पोलिसांनी शुक्रवारी परवानगी नाकारली. ...

कोल्हापूर : कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत कन्हैयाकुमारच्या आज शनिवारी दसरा चौकात होणाऱ्या जाहीर सभेला पोलिसांनी शुक्रवारी परवानगी नाकारली. यावरून आयोजक व पोलिसांमध्ये लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात जोरदार वादावादी झाली. पोलीस परवानगी न देण्यावर ठाम राहिल्याने आयोजकांनी सभा यशस्वी करण्याचा निर्धार करून सभेची तयारी सुरू केली.

गोविंदराव पानसरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शनिवारी यूथ फेडरेशनने जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमारच्या जाहीर सभेचे सायंकाळी सात वाजता दसरा चौकात आयोजन केले होते. त्यासाठी महानगरपालिकेने गेल्या सोमवारीच साडेपाच हजार रुपये भाडे घेऊन मैदानही वापरण्यास दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही सभेला परवानगी दिली आहे. असे असतानाही शुक्रवारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे मंगेश चव्हाण यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत ही सभा घेण्यास परवानगी देता येत नसल्याचे आयोजक गिरीश फोंडे यांना कळवले. यावरून वातावरण तापले.

पोलीस प्रशासनातर्फे चव्हाण यांनी हा खुल्या मैदानात कार्यक्रम होत असल्याने परवानगी देता येणार नाही, बंदिस्त सभागृहात घ्या, असे सुचवले; पण याला आयोजकांकडून नकार आला. पानसरे यांच्यासारख्या पुरोगामी विचारवंताचा खून होतो, त्याच्या मारेकऱ्यांचा शोध घेतला नाही हे निषेधार्ह आहे. अशा प्रकारे गळचेपी सहन करणार नाही, असे सांगत कार्यकर्ते पोलीस ठाण्यातून संध्याकाळी बाहेर पडले.

चौकट ०१

रविशकुमार यांचा ऑनलाइन कार्यक्रम

पानसरे स्मृतिदिनानिमित्त श्रमिक प्रतिष्ठानतर्फे रविशकुमार, कुमार केतकर यांचा ऑनलाइन व्याख्यानाचा कार्यक्रम मात्र आज शनिवारी ठरल्याप्रमाणे सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक सभागृहात होत आहे. यासाठी बैठक व्यवस्थेसह स्क्रीन लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.