शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या पगाराचे वांदे

By admin | Updated: August 19, 2015 23:21 IST

महापालिका : एलबीटी निर्णयानंतर आर्थिक स्थिती ढासळली

कोल्हापूर : पन्नास कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या सर्व व्यापाऱ्यांना १ आॅगस्टपासून एलबीटीमधून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे महानगरपालिकेचा आर्थिक कणा मोडला आहे. त्याचा पहिला दणका कर्मचाऱ्यांच्या पगाराला बसणार आहे. सप्टेंबर महिन्यात होणारे कर्मचाऱ्यांचे पगार कधी आणि कसे भागावायचे, या प्रश्नाने मनपा प्रशासन चिंताग्रस्त झाले आहे. विकासकामे थांबविता येतील, खर्चाची काटकसर केली जाईल, पण पगार कसे थांबविणार हाच प्रश्न तीव्रतेने जाणवत असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. १ आॅगस्टपासून एलबीटीमधून सूट मिळाल्यामुळे कोल्हापुरात व्यापाऱ्यांनी कर भरणे आता बंद केले आहे. गेले दोन महिने भरणाही कमी होत होता. त्याचा परिणाम आता पालिकेच्या उत्पन्नावर झालेला आहे. महिन्याला सरासरी ८ कोटी रुपयांपर्यंत एलबीटी जमा होत होता. तो आता पूर्णपणे बंद झाला आहे. एलबीटी सुरू होता तोपर्यंत प्रत्येक महिन्याचा १ ते ७ तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार होत होते, पण आता आवकच कमी झाल्यामुळे आॅगस्ट महिन्याचे कर्मचाऱ्यांचे पगार कसे भागवायचे, असा प्रश्न प्रशासनला भेडसावू लागला आहे. मंजूर निधी आलाच नाहीराज्य सरकारने एलबीटी रद्द केल्यानंतर महानगरपालिकांना अर्थसाह्य करण्याची भूमिका घेतली असून गत वर्षीच्या आॅगस्ट महिन्यात जेवढा एलबीटी जमा झाला होता, तेवढीच रक्कम निधीच्या स्वरूपात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ६ कोटी ४२ लाख रुपये निधी मंजूर झाल्याच्या वृत्तपत्रांतून बातम्या आल्या, पण अद्याप निधी मिळालेला नाही. हा निधी वेळेत मिळाला तरच काही प्रमाणात पगारावरील भार हलका होईल. जर तो वेळेवर मिळाला नाही, तर मात्र पगार होणे अशक्य आहे. (प्रतिनिधी)