शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पुतळा सुशोभीकरणाच्या कामास मिळणार गती

By admin | Updated: December 19, 2014 00:12 IST

महापालिका : वीज, पाणी जोडणीसाठी थांबले काम; राजर्षी शाहू, आईसाहेब महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण

कोल्हापूर : दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज व अयोध्या चित्रमंदिराच्या दारात असलेल्या आईसाहेब महाराज पुतळ्याभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. गेले काही दिवस बंद असलेले हे काम वीज व पाणी जोडणी झाल्याने आता दोन दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी ‘लोकमत’ला दिली.दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याभोवती संरक्षक कठड्यासह सुशोभीकरणाच्या कामास आठ महिन्यांपूर्वी महापालिकेने सुरुवात केली. पुतळ्याभोवतीची तटबंदी काढून पूर्वीप्रमाणेच पुतळ्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊनच शोभेल अशा प्रकारचे सुशोभीकरणाचे काम करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यानुसार पुतळ्याभोवती असणाऱ्या पूर्वीच्या रिलिंगप्रमाणेच नव्याने रिलिंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, पुतळ्याभोवती लहान कारंजे, रिकाम्या जागेत दगडी पेव्हिंग बसविणे, छोटा बगीचा, वीज व्यवस्था, आदी कामे अपूर्ण आहेत. आईसाहेब महाराज यांच्या पुतळ्याभोवती असणारे संरक्षण कुंपन खराब होऊन पुतळ्यासमोरील मोठा कारंजाही गेली कित्येक वर्षे बंद स्थितीत होता. वाहनांच्या धुरामुळे संगमरवरी पुतळाही काळवंडला आहे. आईसाहेब महाराजांच्या पुतळ्याची दुरवस्था थांबविण्याची मागणी नागरिकांतून होती. त्याची दखल घेत महापालिकेने पुतळ्याभोवती सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात केली; मात्र गेली वर्षभर सुरू असलेले काम अद्याप अपूर्णच आहे. नवीन आराखड्यानुसार पुतळ्याच्या मागून असलेल्या प्रवेशात बदल करून पूर्वेकडून प्रवेशद्वार व मागील बाजूस बगीचा, शिवाजी टेक्निकल व ट्रेझरीच्या बाजूला दीर्घकाळ टिकणारे छोटे कारंजे उभारून विद्युत रोषणाईचे काम अद्याप अपूर्णच आहे. दोन्ही पुतळ्यांचे सुशोभीकरण त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)रस्त्याची उंची वाढल्याने पुतळ्याभोवतीची जागा खाली सखलात गेली आहे. हे टाळण्यासाठी पुतळ्याभोवती पूर्वीप्रमाणेच पिलर व ग्रिलिंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पाणी व वीज जोडणीमुळे पुढच्या टप्प्यातील कामे थांबली होती. येत्या दोन दिवसांत पुन्हा कामास सुरुवात होईल. - हर्षजित घाटगे (उपशहर अभियंता)