Kolhapur: खोकल्याचे औषध समजून किटक नाशक पिले, आमजाई व्हरवडे येथील अकरा वर्षीय वेदांत यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 19:25 IST2024-07-06T19:24:25+5:302024-07-06T19:25:28+5:30
आमजाई व्हरवडे : खोकल्याचे औषध समजून किटक नाशक पिल्याने आमजाई व्हरवडे (ता.राधानगरी) येथील अकरा वर्षीय वेदांत अशोक पाटील याचा ...

Kolhapur: खोकल्याचे औषध समजून किटक नाशक पिले, आमजाई व्हरवडे येथील अकरा वर्षीय वेदांत यांचा मृत्यू
आमजाई व्हरवडे : खोकल्याचे औषध समजून किटक नाशक पिल्याने आमजाई व्हरवडे (ता.राधानगरी) येथील अकरा वर्षीय वेदांत अशोक पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वेदांत इयत्ता पाचवीत शिकत होता.
याबाबत माहिती अशी की, वेदांत किरकोळ आजारी होता. थोडासा खोकला असल्यामुळे शाळेला जाताना खोकल्याचे औषध घ्यायचे म्हणून गडबडीने त्यांने आई वडिलांच्या माघारीच औषध समजून किटक नाशक पिले. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने मोठ्या भावाने लगेच आईला सांगितले. तेव्हा आईला त्याने बाटलीकडे बोट दाखवत या बाटलीतील औषध पिल्याचे सांगितले.
आईने तत्काळ पतीला फोन करुन घरी बोलावून घेत वेदांत याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असतानाच आज, पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. यावेळी आई, वडील व कुटुंबियांनी केलेला आक्रोश ह्दय हेलावून टाकणारा होता. त्याच्या पश्चात्त आई वडिल व एक मोठा भाऊ असा परिवार आहे.