जयसिंगपुरात इलेक्ट्रीकल दुकानाला लागली आग, इमारतीत अडकले विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 19:23 IST2022-02-07T19:15:08+5:302022-02-07T19:23:37+5:30
प्रसंगावधान राखून शिक्षक व विद्यार्थी सुखरुपपणे बाहेर पडले.

जयसिंगपुरात इलेक्ट्रीकल दुकानाला लागली आग, इमारतीत अडकले विद्यार्थी
जयसिंगपूर : येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावरील इलेक्ट्रीकल दुकानाला अचानक आग लागल्याने धावाधाव सुरु झाली. या इलेक्ट्रीकल दुकानाच्या पहिल्या मजल्यावर संगणक प्रशिक्षण केंद्रात दहा ते पंधरा विद्यार्थी अडकून पडले होते. प्रसंगावधान राखून शिक्षक व विद्यार्थी सुखरुपपणे बाहेर पडले.
शिवाय शेजारी अन्य दुकानांचे आगीपासून नुकसान टळले. जयसिंगपूर नगरपालिकेच्या अग्नीशामक दलाने शर्तीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. या आगीत इलेक्ट्रीकल दुकानाचे मोठे नुकसान झाले.
आज, सोमवारी दुपारच्या सुमारास बंद दुकानातून धुर येऊ लागला. धुराचे लोण पसरल्याने पहिल्या मजल्यावरील संगणक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी आरडाओरड सुरु केली. त्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. एक तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आग आटोक्यात आणली.