शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सहकार बँकेची निवडणूक लटकली

By admin | Updated: July 9, 2015 00:46 IST

नागपूर खंडपीठात दावा : संचालकांची संख्या वाढविण्याची मागणी

विश्वास पाटील - कोल्हापूर--महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची निवडणूक नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या दाव्यामुळे लटकली आहे. ही निवडणूक ३० जूनपूर्वी जाहीर करण्याचा सहकार निवडणूक प्राधिकरणाचा प्रयत्न होता; परंतु या याचिकेमुळे त्याला खो बसला आहे. या याचिकेचा काय व कधी निर्णय लागतो, यावरच निवडणूक कधी होणार हे ठरणार आहे.राज्यातील मुदत संपलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँका व राज्य बँकेची निवडणूकही ३० जूनपूर्वी घेण्याची हमी राज्य शासनाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली होती. त्यानुसार जिल्हा बँकांच्या निवडणुका झाल्या; परंतु राज्य बँकेची निवडणूक मतदार यादी पूर्ण होऊनही लटकली आहे. पूर्वी बँकेचे संचालक मंडळ ४८ जणांचे होते; परंतु नव्या सहकार कायद्यानुसार ही संख्या २१ पर्यंतच मर्यादित करण्यात आली. त्याला विदर्भातील सहकारातील ज्येष्ठ नेते अरविंद पोरड्डीवार यांनी गडचिरोली जिल्हा बँकेचे संचालक जागोबा तुकाराम खेडकर यांच्यामार्फत नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला; परंतु आता या याचिकेची नेमकी काय स्थिती आहे, हे त्यांनाही माहीत नाही. संचालक मंडळाची संख्या वाढविण्याची मागणी ही पोटनियमाला नव्हे, तर थेट महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या ९७ व्या घटनादुरुस्तीस आव्हान देणारी आहे. त्यामुळे खंडपीठ त्याबाबत काय निर्णय देते याकडे निवडणूक प्राधिकरण लक्ष ठेवून आहे. याचिकेचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत राज्य बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करता येत नाही, अशी ही गोची झाली आहे.राज्य बँकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाल्याने न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत.- डॉ. आनंद जोगदंड,सचिव, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण, पुणेनवे प्रशासकीय मंडळ प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष एम. एल. सुखदेवे (‘नाबार्ड’चे निवृत्त मुख्य सरव्यवस्थापक)सदस्य : ए. ए. मगदूम (बँक आॅफ महाराष्ट्रचे निवृत्त सरव्यवस्थापक) व के. एन. तांबे (निवृत्त उपसरव्यवस्थापक, बँक आॅफ इंडिया)