शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र, गोवा बार काउन्सिलसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मतदान, मतमोजणी कधी...जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:27 IST

Maharashtra, Goa Bar Council Election: अर्ज भरताना किती रुपये शुल्क भरावे लागणार..वाचा

कोल्हापूर : महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या निवडणुकीची घोषणा गुरुवारी (दि. २२) झाली. महाराष्ट्रासह गोवा, दादरा नगर हवेली आणि दमण-दिव येथे २४ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर १५ दिवसांत निकाल अपेक्षित आहे. बार काउन्सिलसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्याने निवडणूक चुरशीने होण्याचे संकेत मिळत आहेत.महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या रखडलेल्या निवडणुकीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी आहे. त्यामळे उमेदवारी मिळविण्यासाठी दोन्ही राज्यातील इच्छुकांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. कोल्हापुरातून तीन उमेदवार इच्छुक असून यात एका महिला प्रतिनिधीचाही समावेश आहे. सांगली, सातारा, पंढरपूर, सोलापूर आणि सिंधुदुर्गमधून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन बार असोसिएशनची भेट घेऊन आपली भूमिका मांडली जात आहे. तसेच प्रचारासाठी सोशल मीडियाचाही आधार घेतला जात आहे. महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दमण आणि दिव येथून सुमारे एक लाख ६० हजार वकील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी संचालक मंडळात प्रथमच पाच महिलांना संधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे.हे मुद्दे येतील चर्चेतमुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे पूर्ण खंडपीठात रूपांतर करणे, ज्युनिअर वकिलांसाठी स्टायपेंड सुरू करणे, वकील सुरक्षा कायदा, ई-फायलिंमधील अडचणी आणि आपत्कालीन निधी वाढविण्याचे मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात असतील.

शुल्क ४० हजारांवरून सव्वा लाखयापूर्वी झालेल्या निवडणुकीत उमेदवारांना अर्ज भरताना ४० हजार रुपये शुल्क आकारणी केली जात होती. यात वाढ झाली असून उमेदवारांना एक लाख २५ हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क उमेदवारांना परत मिळणार नाही.यांची नावे चर्चेतकोल्हापुरातून काउन्सिलचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजित मोहिते यांच्यासह शैलजा चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. पंढरपूरमधून धनश्री घाडगे, महेश कसबे, सातारा जिल्ह्यातून वसंतराव भोसले, सोलापुरातून माजी संचालक मिलिंद थोबडे आणि सिंधुदुर्गमधून माजी संचालक संग्रामसिंह देसाई यांची नावे चर्चेत आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

  • घोषणा - २२ जानेवारी
  • अर्ज भरणे - २६ फेब्रुवारी
  • अर्जांची छाननी - २८ फेब्रुवारी
  • उमेदवार यादी जाहीर - १ मार्च
  • माघार - २ ते ४ मार्च
  • अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध - ४ मार्च
  • मतदान - २४ मार्च
  • निकाल - मतदानानंतर १५ दिवस
English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra, Goa Bar Council Election Schedule Announced; Voting Date Set

Web Summary : Maharashtra and Goa Bar Council elections set for March 24. Results expected within 15 days. Increased candidate numbers signal a competitive race focusing on key issues like advocate safety and junior lawyer stipends.