म्हासुर्ली येथे घर जळून साडे आठ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST2021-05-23T04:24:02+5:302021-05-23T04:24:02+5:30

वारीक हे दहा वर्षांपासून म्हासुर्ली येथील मिळालेल्या पुनर्वसित शेत जमिनीत घर बांधून राहत आहेत. शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास ...

Eight and a half lakh loss due to house burning at Mhasurli | म्हासुर्ली येथे घर जळून साडे आठ लाखांचे नुकसान

म्हासुर्ली येथे घर जळून साडे आठ लाखांचे नुकसान

वारीक हे दहा वर्षांपासून म्हासुर्ली येथील मिळालेल्या पुनर्वसित शेत जमिनीत घर बांधून राहत आहेत. शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास घरातील वायरमध्ये शॉर्टसर्किट होऊन घरास आग लागली. मात्र, घरातच वैरणीसाठीचे वाळके गवत भरले असल्यामुळे आगीने लगेचच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण घराने पेट घेतला. शेजारच्या लोकांनी घरातील लहान मुलासह महिलांना तसेच गोठ्यातील जनावरांची दावी कापून त्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत शेती सामानासह कौटुंबिक साहित्य जळून खाक झाले. मंडल अधिकारी देविदास तरडे, तलाठी विजय पाटील, पोलीस पाटील भरत पांडव, सुनील हुंबे आदींसह ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी या घटनेचा पंचनामा केला. यात साडेआठ लाख रुपये नुकसान झाल्याचे सांगितले.

Web Title: Eight and a half lakh loss due to house burning at Mhasurli