पोलिसांवरीत ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, पालकमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 03:35 PM2020-02-22T15:35:42+5:302020-02-22T15:37:25+5:30

राज्यातील पोलिसांच्या आत्महत्या रोखा, त्यांचा ताणतणाव कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, पोलिस समन्वय समिती स्थापन करावी, या मागणीचे निवेदन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव संजय पाटील यांनी दिले.

Efforts should be made to reduce stress on police | पोलिसांवरीत ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, पालकमंत्र्यांना निवेदन

पोलिसांवरीत ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, पालकमंत्र्यांना निवेदन

Next
ठळक मुद्देपोलिसांवरीत ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, पालकमंत्र्यांना निवेदनपोलिस समन्वय समिती स्थापन करण्याची मागणी

कोल्हापूर : राज्यातील पोलिसांच्या आत्महत्या रोखा, त्यांचा ताणतणाव कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, पोलिस समन्वय समिती स्थापन करावी, या मागणीचे निवेदन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव संजय पाटील यांनी दिले.

मागील सरकारच्या कार्यकालामध्ये पाच वर्षात १३८ पोलिसांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अवेळी जेवण, अपुरी झोप, कामाचा वाढता ताण यामुळे पोलिसांचे मानसिक स्वास्थ बिघडते, तसेच कुटूंबिक स्वास्थावरही परिणाम होत आहे. त्यांचा तणाव दूर होण्यासाठी योगासने, क्रिडा व मनोरंजनात्मक कार्यक्रम घ्यावेत.

पोलिस कुटूंबिय समन्वय समिती स्थापनेचे मागील सरकारचे आश्वासन कागदावरच राहिल्याने ही समिती स्थापन करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी परवेज सय्यद, दीपक काश्यप, योगेश हतलगे, राहुल उदगट्टे, सार्थक तोरस्कर, सुधीर फडके, अनिल परब आदी उपस्थित होते.
 

 

Web Title: Efforts should be made to reduce stress on police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.