हुपरीत व्यावसायिकावर ईडीचा छापा, सलग १५ तास कसून चौकशी; कारवाईने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ

By उद्धव गोडसे | Updated: June 21, 2025 13:28 IST2025-06-21T13:28:10+5:302025-06-21T13:28:36+5:30

ईडीसह पोलिसांकडून गोपनीयता

ED raids businessman in Hupari Kolhapur, conducts thorough interrogation for 15 hours | हुपरीत व्यावसायिकावर ईडीचा छापा, सलग १५ तास कसून चौकशी; कारवाईने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ

हुपरीत व्यावसायिकावर ईडीचा छापा, सलग १५ तास कसून चौकशी; कारवाईने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ

कोल्हापूर : ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने शुक्रवारी हुपरी (ता. हातकणंगले) येथील व्यावसायिक आणि हुपरी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे यांच्या घरावर छापा टाकला. पहाटेपासून सलग १४५ तास लठ्ठे यांची चौकशी सुरू होती. या कारवाईने हुपरीसह जिल्ह्यात खळबळ उडाली असून, छापेमारीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

ईडीच्या पथकांनी शुक्रवारी देशात अनेक ठिकाणी छापेमारी केली. या कारवाई दरम्यान एक पथक चंदेरीनगरी हुपरी येथील व्यावसायिक भरत लठ्ठे यांच्या घरी पोहोचले. लट्ठे यांनी सुरू केलेल्या भिशी, निधी बँक आणि परवानाधारक खासगी सावकारीच्या व्यवहारांची माहिती पथकाने घेतली. त्यांची बँक खाती आणि आर्थिक व्यवहाराचे तपशील अधिका-यांनी तपासले. याबाबत सलग १५ तास त्यांची कसून चौकशी सुरू होती.

लठ्ठे कुटुंबीयांसह त्यांच्या काही नातेवाईकांचीही चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, कारवाईचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. लठ्ठे यांचे एक मित्र दुबईत व्यावसायिक आहेत. तसेच ते निधी बँक चावलतात. याच्याशी संबंधित माहिती अधिका-यांनी घेतल्याचे समजते. 

व्यावसायिक लठ्ठे हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत. त्यांच्यापेक्षा मोठे आर्थिक व्यवहार असलेले अनेक व्यावसायिक हुपरीत आहेत. तरीही त्यांच्यावरच ईडीची छापेमारी का झाली, हे स्पष्ट झालेले नाही. 

Web Title: ED raids businessman in Hupari Kolhapur, conducts thorough interrogation for 15 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.