इको-सेन्सिटिव्ह झोनमुळे राधानगरीचे प्रतिबंधित क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 08:33 PM2020-10-22T20:33:05+5:302020-10-22T20:35:17+5:30

Radhanagri, forestnews, sindhdurgnews, kolhapurnews, gagette राधानगरी वन्यजीव अभयारण्यासह कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ४१ गावे इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर झाली असून तशी अंतिम अधिसूचना केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन मंत्रालयाने जारी केली आहे. यामुळे राधानगरीचे प्रतिबंधित क्षेत्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत वाढले आहे.

The eco-sensitive zone increased the restricted area of Radhanagari | इको-सेन्सिटिव्ह झोनमुळे राधानगरीचे प्रतिबंधित क्षेत्र वाढले

इको-सेन्सिटिव्ह झोनमुळे राधानगरीचे प्रतिबंधित क्षेत्र वाढले

googlenewsNext
ठळक मुद्देइको-सेन्सिटिव्ह झोनमुळे राधानगरीचे प्रतिबंधित क्षेत्र वाढलेअधिसूचना जारी : कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४१ गावांचा समावेश

कोल्हापूर : राधानगरी वन्यजीव अभयारण्यासह कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ४१ गावे इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर झाली असून तशी अंतिम अधिसूचना केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन मंत्रालयाने जारी केली आहे. यामुळे राधानगरीचे प्रतिबंधित क्षेत्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत वाढले आहे.

या नव्या अधिसूचनेमुळे २५,०६५.८८ हेक्टर अतिरिक्त क्षेत्र आता प्रतिबंधित झाले आहे. यामध्ये १८,८८७.९४ हेक्टर जंगल क्षेत्राचा, तर ६,१७७.९४ हेक्टर जंगलाबाहेरच्या क्षेत्राचा समावेश आहे. वन्यजिवांच्या संवर्धनासाठी राधानगरी अभयारण्याच्या सीमेच्या चारीही बाजूंनी २०० मीटर ते ६.०१ किलोमीटर परिसरातील गावे आता संवेदनशील झोन म्हणून संरक्षित झाली आहेत. ही अधिसूचना १५ ऑक्टोबर २०२० रोजी भारतीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने राधानगरी अभयारण्याच्या विस्ताराचा निर्णय घेतला होता. यासाठी १० जुलै २०१९ रोजी अधिसूचना जारी करून संभाव्य संवेदनशील क्षेत्रातील गावांमधून हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. यासाठी ६० दिवसांची मुदत दिली होती. अनेक गावांनी तसेच वनविभागानेही काही सूचना आणि हरकती घेतल्या होत्या. पूर्वीच्या प्रस्तावात अभयारण्यापासून १० किलोमीटरच्या हवाई अंतर क्षेत्रातील गावांत केंद्र सरकारने निर्बंध घातले होते, ते आता कमी करून ६.०१ किलोमीटर इतके केले आहे.

या गावांचा अतिरिक्त समावेश

पूर्वी फक्त राधानगरी तालुक्यापुरते मर्यादित असलेले राधानगरी अभयारण्याचे क्षेत्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत वाढलेले आहे. कोल्हापूर विभागात गगनबावडा तालुक्यातील बावेली, तळेखुर्द, बोरबेट, सालगाव, गारिवडे, राधानगरी तालुक्यातील कंदलगाव, मानबेट, राही, पडसाळी, दुर्गमानवाड, पिरळ, सोन्याची शिरोली, बुजवडे, हेळेवाडी, पनोरी, फराळे, लिंगाचीवाडी, ऐनी तसेच भुदरगड तालुक्यातील फये, हेदवडे, येरंडपे, वासणोली, कोंडोशी, करंबळी, अंतुर्ली, शिवडाव या २६ गावांचा समावेश या झोनमध्ये आहे.

सावंतवाडी विभागातील कुडाळ तालुक्यातील दुर्गानगर, यवतेश्वर, जांभळगाव, कणकवलीतील नरडवे, रांजणगाव, नाटळ, कुंभवडे, भिरवंडे, रामेश्वरनगर, गांधीनगर, हरकूळ खुर्द, फोंडा, घोणसरी, वैभववाडी तालुक्यातील कुर्ली, शिराळे या १५ गावांचा समावेश आहे.

Web Title: The eco-sensitive zone increased the restricted area of Radhanagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.