Kirnotsav २०२५: सातव्या दिवशी किरणे अंबाबाईच्या खांद्यापर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:37 IST2025-11-14T12:36:08+5:302025-11-14T12:37:42+5:30
हवेत बाष्प व धुक्याचे प्रमाण जास्त होते त्यामुळे किरणांची तीव्रता कमी

Kirnotsav २०२५: सातव्या दिवशी किरणे अंबाबाईच्या खांद्यापर्यंत
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात गुरुवारी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या खांद्यापर्यंत पोहोचून लुप्त झाली. मात्र, किरणांची तीव्रता कमी होती.
किरणोत्सवाच्या सातव्या दिवशी ढगाळ वातावरण असल्याने हवेत बाष्प व धुक्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे किरणांची तीव्रता कमी हाेती. सोनेरी किरणांनी सायंकाळी ५:०० वाजता मंदिर महाद्वारातून मंदिरात प्रवेश केला. ही सूर्यकिरणे हळूहळू ५ वाजून ३४ मिनिटांनी पितळी उंबऱ्यावर पोहोचली. नंतर चरणस्पर्श करत गुडघ्यापर्यंत पोहोचली.
सायंकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी देवीच्या हातातील म्हाळुंगापर्यंत, त्यानंतर ५ वाजून ४७ मिनिटांनी देवीच्या उजव्या बाजूला खांद्यापर्यंत पोहोचली. काही वेळ स्थिरावून लुप्त झाली. त्यानंतर मंदिरामध्ये देवीची आरती होऊन हा सोहळा पार पडला.