शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांमुळेच तेजसची शिक्षणाची बिकट वाट ‘वहिवाट’

By admin | Updated: August 3, 2015 00:07 IST

मित्रत्वाला सलाम : आणूरमधील दोस्तांची गट्टी

दत्तात्रय पाटील - म्हाकवे -जन्मत:च कंबरेखालील अपंगत्व आलेल्या मात्र मनामध्ये शिक्षणाची ज्योत प्रज्वलित असणाऱ्या आणूर (ता. कागल) येथील तेजस संभाजी माने या आठवीतील विद्यार्थ्यांला त्याच्या जिवाभावाच्या मित्रांमुळेच शिक्षण घेणे शक्य होत आहे.घरापासून त्याची शाळा अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे त्याला अपंगांसाठी असणाऱ्या सायकलने जावे लागते. ही सायकल पाठीमागून ढकलत त्याला शाळेला नेणे आणि सायंकाळी व्यवस्थित घरी पोहोचविण्याचेही काम त्याचे मित्र दररोज इमाने-इतबारे करतात. शाळेत अ-१ श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या तेजसला या मित्रांचे मिळणारे सहकार्य अनमोल आहे. त्याच्या आठ मित्रांच्या सहकार्यामुळेच तेजसला शिक्षणाची अवघड वाट ‘वहिवाट’प्रमाणे सोपी झाली आहे. आणूर येथील तेजसच्या मित्रांनी केवळ एका दिवसापुरता ‘फे्रंडशिप’ मर्यादित न ठेवता. तो गेल्या सहा-सात वर्षांपासून चिरंतन ठेवला आहे. तेजसचे दफ्तर, डबा, पाण्याची बाटली सांभाळण्यासह त्याची सायकल ढकलत शाळेला जाताना या मित्रांना थोडेही ओझे वाटत नाही. उन्हाळ्यामध्ये सकाळी १०.३० ते ११च्या दरम्यान सायकल ढकलताना हे मित्र घामाने चिंब झालेले असतात, तर पावसाळ्यामध्ये स्वत: भिजून तेजसला मात्र सुरक्षित घरी पोहोचविण्याची जणू अलिखित जबाबदारीच या मित्रांनी घेतली आहे. तेजस पहिलीपासून मन लावून शिक्षण घेत आहे. सातवीमध्ये त्याला अ-१ श्रेणी मिळाली असून, सध्या तो महात्मा हायस्कूल, आणूर येथे शिकत आहे. घरामध्ये तो एकुलता आहे. तेजसला मित्रत्वाचा हात देणाऱ्यांमध्ये वैभव नंदकुमार माने, निखिल आप्पासो माने, समित आनंदा माने, अभिषेक बेनाडे, समाधान धोंडिराम माने, विश्वनाथ नंदकुमार पाटील, प्रथमेश भोसले, सौरभ तात्यासो गोते यांचा समावेश आहे. तेजसला शासनाचे हवे मित्रत्वतेजसकडे असणाऱ्या सायकलीच्या पुढील बाजूंची दोन्ही चाके खराब झाली आहेत. तेजसचे वजनही वाढले असून, त्यामुळे त्याच्या मित्रांना अधिकच त्रास होत आहे. शासनाने विचार करून तेजसला नव्याने सायकल देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. मित्रांच्या सहकार्यामुळे शिक्षणासह जगण्याची उमेद द्विगुणीत झाली आहे. शरीराने अपंगत्व असले तरी मी या मित्रांसह आई, वडील, शिक्षकांच्या प्रेरणेमुळे मनाने खूपच सुदृढ झालो आहे, असेही तेजस याने सांगितले. त्यामुळे मी सर्वांचाच ऋणी राहीन.- तेजस संभाजी माने, आणूर