शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांमुळेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रास ‘खो’

By admin | Updated: November 12, 2014 00:17 IST

अडचणी वाढल्या : ३१ जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे आव्हान

संतोष पाटील -- कोल्हापूर कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सिव्हेज ट्रिटमेंट प्लँट) कोणत्याही परिस्थितीत ३१ जानेवारीपूर्वी सुरू करण्यासाठी महापालिकेची धावाधाव सुरू आहे. सहा फूट व्यासाची शेतातून जाणारी पाईप आता ऊस तोडणीमुळे रखडण्याची शक्यता आहे. ठेकेदाराच्या आर्थिक अडचणीनंतर आता तांत्रिक कारणात अडकलेला प्रकल्प सुरू करण्यासाठी न्यायालयाचा तगादा असल्याने महापालिकेसमोरील अडचणी वाढत आहेत. न्यायालयाचा आदेश, पर्यावरणप्रेमींचा दबाव, ठेकेदाराची अकार्यक्षमता, यामुळे केंद्राची जुजबी चाचणी घेऊन निवडणूक कॅश करण्यासाठी थाटात उद्घाटन घेणारे प्रशासन पुरते हबकले आहे. शहरातील सांडपाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने महापालिकेला एप्रिल २०१३ची ‘डेडलाईन’ दिली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यामध्ये वाढ करत ३१ मार्च २०१४ पर्यंत कें द्र सुरू करणे महापालिकेला बंधनकारक होते. यानंतर वीज जोडणी करताना कमी दाबाचा ट्रान्स्फॉर्मर असल्याचे लक्षात आल्याने ३१ मेपर्यंत मुदत वाढविली. १५ जुलैपर्यंत जुजबी चाचण्या घेत २८ जुलैला उद्घाटनाचे सोपस्कारही पूर्ण केले. मात्र, सहापैकी फक्त दोन सी-टेक केबिन अंशत: सुरू होत्या. परंतु, सेंट्रिफ्युज सिस्टीम, क्लोरिनेशनची सोय, सांडपाणी घेऊन येणाऱ्या व शुद्ध पाण्याचे वहन करणाऱ्या पाईपलाईनची कामे, लाईन बझार व बापट क ॅम्प येथील पाणी आणण्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याचा दावा प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने न्यायालयात केला. यामुळे महापालिका प्रशासन व ठेकेदाराची लबाडी उघड झाली. काम त्वरित सुरू करण्याचे आयुक्तांचे आदेशसांडपाणी प्रक्रिया केंद्र ३१ जानेवारीपर्यंत सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी महापालिकेत आयुक्त कार्यालयात पंचगंगा प्रदूषणाशी संबंधित सर्व विभागांतील अधिकाऱ्यांची बैठक झाली. सद्य:स्थितीचा आढावा घेऊन त्वरित अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केंद्राचे ठेकेदार विश्वा इन्फ्राचे सुरिंदर यांना दिले. प्रक्रियेनंतरचे पाणी वाहून नेणारी पाईप टाकण्याचे काम अपूर्ण आहे. लवकरच हे सुरू करू, अशी माहिती सुरिंदर यांनी दिली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी ठेकेदारास चांगलेच फैलावर घेतले. न्यायालयाच्या निर्देशानुसार, ३१ जानेवारीपूर्वी प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा महापालिके चा प्रयत्न सुरू आहे. उपकरण बसविण्यात आली आहेत. पावसाळ्यानंतरच्या कामास अद्याप ठेकेदाराने गती घेतलेली नाही. पाईपलाईनचे काम पूर्ण होताच प्रक्रिया केंद्र पूर्णक्षमतेने सुरू होईल. - आर. के. पाटील (पर्यावरण अभियंता - महापालिका)अधिभाराचे आठ कोटी जमाचाचणी परीक्षणादरम्यान उच्च न्यायालयास अहवाल देण्यापूर्वी, तसेच उद्घाटनापूर्वी एक दिवस, असे एकूण तीन दिवसच ‘एसटीपी’ सुरू झाले. एक एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी १४११ रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्राची सध्याची क्षमता ७६ एमएलडी आहे. यानुसार प्रतिदिन ६७ हजार ७२८ रुपये महापालिकेला सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी खर्च करावे लागतील. ठेकेदाराने ७५ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिश्श्याची घातलेली ३० टक्के रक्कम भागविण्यासाठी नागरिकांवर सांडपाणी अधिभार लावला आहे. गेल्या वर्षी साडेचार कोटी व आॅक्टोबरअखेर साडेतीन कोटी, असे एकूण आठ कोटी रुपये प्रक्रिया केंद्र सुरू होण्यापूर्वीच जमा झाले आहेत.