शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2015 01:23 IST

नवरात्रौत्सव : संतानलक्ष्मी रूपात पूजा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला शनिवारी करवीरनिवासिनी अंबाबाईची संतानलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. जुना राजवाड्यातील तुळजाभवानीची दाक्षिणात्य रूपात पूजा बांधण्यात आली. अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा ओघ शनिवारीही होता. दुपारनंतर काहीअंशी गर्दी कमी झाली. शनिवारी सकाळी अंबाबाईचा शासकीय अभिषेक झाल्यानंतर दुपारची आरती करण्यात आली. देवीची संतानलक्ष्मी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली.आजची पूजा मयूर मुनीश्वर, अरुण मुनीश्वर, सोहम मुनीश्वर, रवी माईणकर यांनी बांधली. दिवसभरात माउली आध्यात्मिक भजनी मंडळ, सानेगुरुजी भजनी मंडळ, ज्ञानाई सांस्कृतिक मंडळ, आदी संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी काढण्यात आली. अभियंता नेत्रदीप सरनोबत, मनीष पोवार, देवस्थानचे सदस्य राजेंद्रअण्णा देशमुख, हिरोजी परब, डॉ. जयश्री कटारी, उपायुक्त (सेल्स टॅक्स), लालबहादूर कटारी यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. लाडू प्रसाद गायब देवस्थान समितीने ऐन नवरात्रात लाडू प्रसादाचा ठेका बदलल्याचा त्रास भाविकांना सहन करावा लागत आहे. ज्यांना हा ठेका दिला गेला त्या संस्थेला अद्याप भाविकांच्या संख्येचा अंदाज आलेला नाही. शनिवारी तर लाडूप्रसाद नव्हताच. उलाढाल लाखोंत... परिसरात मात्र रोज लाखोंची उलाढाल होत आहे. देवीसाठीची साडी, वेणी, तेल, कापूर, उदबत्ती या पूजेच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. याशिवाय फूलवाले, रांगोळी, वस्त्रमाळ अशा साहित्याची विक्री होत असल्याने सध्या एका दिवसातील उलाढाल लाखोंत होत आहे. दुपारनंतर गर्दी ओसरली.. शनिवारीदेखील अंबाबाईला भाविकांची गर्दी होती. सकाळी महिला भाविकांची रांग शेतकरी बझारच्या दारात चार पदरी करून फिरविण्यात आली. भाविकांच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून ही सोय करण्यात आली होती. दुपारी चारनंतर मात्र गर्दी ओसरली.