पोलिसाला मद्यपिंनी केली धक्काबुक्की, कोल्हापुरातील घटना

By संदीप आडनाईक | Updated: April 1, 2024 13:11 IST2024-04-01T13:10:04+5:302024-04-01T13:11:04+5:30

कोल्हापूर : रंकाळा परिसरातील उद्यानात रविवारी ओपन बारवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचारी गोरख पाटील यांना मद्यपिंनी धक्काबुक्की केली. ...

Drunkards hit the police, incident in Kolhapur | पोलिसाला मद्यपिंनी केली धक्काबुक्की, कोल्हापुरातील घटना

पोलिसाला मद्यपिंनी केली धक्काबुक्की, कोल्हापुरातील घटना

कोल्हापूर : रंकाळा परिसरातील उद्यानात रविवारी ओपन बारवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचारी गोरख पाटील यांना मद्यपिंनी धक्काबुक्की केली. याबाबतचा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

रंकाळा उद्यान आणि परिसरात ओपन बार सुरू असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी सातत्याने केली होती. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात नियमित गस्त सुरू  ठेवली आहे. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रंकाळा उद्यानात काही तरुण मद्यपान करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच गोरख पाटील आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या तरुणांना हटकले.

यावेळी योगेश उर्फ वाय सी याने गोरख पाटील यांना धक्काबुक्की केली. दोघांच्यात वाद झाल्याने तेथे नागरिकांची गर्दी जमली. अखेर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम जुन्या राजवाडा पोलीस ठाण्यात सुरू होते.

Web Title: Drunkards hit the police, incident in Kolhapur