शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

Kolhapur: इचलकरंजीत नशेत बेदरकारपणे कार चालवत दुचाकी, खांबाला दिली धडक, चालकास पाठलाग करुन पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 15:21 IST

इचलकरंजी : मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवत एका मोटारसायकलला धडक देऊन न थांबता निघून जाणाऱ्या कारचालक युवकाला पोलिसाने फिल्मी ...

इचलकरंजी : मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवत एका मोटारसायकलला धडक देऊन न थांबता निघून जाणाऱ्या कारचालक युवकाला पोलिसाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पकडले. दरम्यान, कारचालकाने एका विद्युत खांबाला धडक दिल्याने कारचा काही भाग तुटला होता. तरीही तो तशीच गाडी दामटत होता. अखेर स्टेशन रोडवरील महापालिकेच्या कमानीजवळ तो पोलिसांच्या हाती लागला. सिद्धार्थ श्रीकांत सगरे (वय २०, रा. कबनूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुरू होते.याबाबत मिळालेली माहिती अशी, कारचालक सिद्धार्थ हा सोमवारी सायंकाळी स्टेशन रोडवरील आंबेडकर पुतळ्याजवळून निघाला होता. त्यावेळी त्याने एका मोटारसायकलस्वाराला धडक दिली. त्यामध्ये तो किरकोळ जखमी झाला. परंतु कारचालकाने अपघातस्थळी न थांबता पलायन केले. त्यावेळी समोरून पोलिस गाडी येत होती. पोलिस गाडी पाहताच त्याने पुन्हा गाडीची गती वाढवली. तेथून त्याने पळून जाण्यासाठी वळण घेताना एका विद्युत खांबाला धडक दिली. त्यामध्ये कारच्या एका बाजूचा चक्काचूर झाला. तशा स्थितीतही त्याने कार दामटली. तो थांबत नसल्याने संशय बळावल्याने गावभागचे पोलिसनाईक प्रमोद आंबी यांनी सायरन न वाजवता त्याचा पाठलाग सुरू केला. हा प्रकार पाहून काही मोटारसायकलस्वारही पोलिस गाडीच्या पाठीमागून आपली गाडी लावली. अखेर कमानीजवळ कारचालक पोलिसांच्या हाती लागला. तेथे नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिस आंबी यांनी त्याला ताब्यात घेतले आणि कारसह शिवाजीनगर पोलिसांच्या हवाली केले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कारमध्ये मद्याची बाटली आणि खाद्यपदार्थ आढळले. त्यामुळे गाडी चालवताना तो मद्यपान करत असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात